राजन साळवींकडे ज्ञात स्रोतांपेक्षा 118 % जास्त संपत्ती; ACB च्या आरोपपत्रात उल्लेख

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अँटी करप्शन ब्युरो अर्थात ACB चौकशीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गटाने मोठा गदारोळ उठवला असला तरी प्रत्यक्षात राजन साळवी यांच्याकडे ज्ञात स्रोतांपेक्षा तब्बल 118% संपत्ती जास्त आढळल्याचा आरोप ACB ने तपासाअंती आरोप पत्रामध्ये केला आहे.Rajan Salvi has 118% more wealth than known sources; Mentioned in ACB’s charge sheet

एसीबी चौकशीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. त्यांनीच जाहीर केलेल्या उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. राजन साळवी यांना चौकशी आणि तपासानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. राजन साळवी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. या कारवाईमुळे त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.

आमदार राजन साळवी यांच्यावर  उत्पन्नापेक्षा जास्त 118% संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी,  पत्नी आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. राजन साळवींच्या यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ACB ने रत्नागिरी, राजापूरसह इतर ठिकाणी छापे घातले. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत

मालमत्ता प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी झाली. आता ACB नेगुन्हा दाखल केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, अटकेला घाबरत नसून आपण जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे साळवींनी सांगितले.

Rajan Salvi has 118% more wealth than known sources; Mentioned in ACB’s charge sheet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात