विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rajan Salvi उद्धव ठाकरे यांना लोक सोडून जात आहेत, याचे आत्मचिंतन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावे, असा सल्ला माजी आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. परंतु, फेब्रुवारी महिन्यातच राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता पुन्हा एकदा राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांवर टीका केली आहे. वेदना, याचना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, असा आरोप साळवी यांनी केला आहे.Rajan Salvi
एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व कणखर
राजन साळवी म्हणाले, दोन ठाकरे एकत्र येण्याचा एकनाथ शिंदेंना फटका बसणार नाही, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व कणखर आहे. मुंबई, ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे मोठे काम असून ठाण्यासह अनेक भागात एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात फक्त एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमची वाटचाल सुरू असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे.
तानाजी सावंतांच्या नाराजीची चर्चा फेटाळून लावली
पुढे बोलताना राजन साळवी म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले समाजसेवेचे व्रत एकनाथ शिंदेंनी घेतले आहे, त्यांच्यासोबत आमचे मार्गक्रमण सुरु आहे. तानाजी सावंत आमचे नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात काम सुरू आहे. असे म्हणत सावंत यांच्या नाराजीची चर्चा राजन साळवी यांनी फेटाळून लावली आहे. दरम्यान, तानाजी सावंत नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या, तसेच शिवसेनेच्या बॅनरवरून त्यांचा फोटो देखील हटवण्यात आला असल्याने धाराशिव येथे त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
मुंबई महापालिकेत महायुतीच निवडून येणार
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर बोलताना राजन साळवी म्हणाले, मुंबई महानगर पालिकेत सर्वोच्च मतांनी महायुतीच निवडून येईल. धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून एकनाथ शिंदेंकडून राजन साळवींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राजन साळवी यांच्याकडून विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला जात आहे. यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App