विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray शिवडी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.Raj Thackeray
उद्धव ठाकरेंची सासूसोबत तुलना
सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, एका बाईला तीन मुले असतात. पहिल्या मुलाचे लग्न होते. त्यावेळी सासू आणि सुनेचे भांडण होते आणि मुलगा ते घर सोडून जातो. सगळे बोलतात नवीन सून आल्यानंतर भांडण झाली. भांडखोर सून होती म्हणून सासूसोबत भांडून घर सोडून गेली. त्यानंतर दुसऱ्या मुलाचे लग्न होते. दुसरी सून घरी येते. यावेळी दुसऱ्या सुनेचे देखील सासूसोबत भांडण होते. तेही घर सोडून जातात. तिसरी सून येते, तो मुलगा देखील बायकोसोबत घर सोडून जातो. त्यानंतर लोकांना कळते की तीन सुना होत्या, त्यांच्यात प्रॉब्लेम नव्हता, तर सासूमध्ये प्रॉब्लेम आहे. ती सासू म्हणजे उद्धव ठाकरे.
उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेची सासू बसली आहे ना, तिचा प्रॉब्लम आहे. जी मुले सोडून गेली त्यांचा नाही. या लोकांनी तुमचा अपमान केला आहे. महाराष्ट्रात 2019 पासून जे घडले ते विसरू नका. या सगळ्याला कारण फक्त एक माणूस तो म्हणजे उद्धव ठाकरे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. सोडून गेलेले गद्दार नाही, तर खरा गद्दार उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले, उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या. या माणसाच्या वागणुकीमुळे राणे बाहेर पडले, त्यांनंतर मी बाहेर पडलो आणि आता शिंदे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
गेल्या 5 वर्षात काय केले या सगळ्याची उजळणी करा, सर्व आठवा आणि मग 20 तारखेला बाळा नांदगावकर यांना मतदान करा. मनसेचे राज्यातील जेवढे उमेदवार आहेत, त्यांना निवडून द्या, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी त्यांचे भाषण संपवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App