प्रतिनिधी
मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे राजकीय कार्ड पुन्हा ऍक्टिव्हेट झाले असून त्यांची नजर आपल्या मूळ बालेकिल्ल्याकडे म्हणजे नाशिककडे वळली आहे. राज ठाकरे हे १६ जुलैपासून तीन दिवस नाशकात मुक्काम ठोकणार असून पडझड झालेल्या मनसे संघटनेची डागडुजी करण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Raj Thackeray to concentrate on nashik again, wants to regain NMC power
कोविड काळात राज ठाकरे हे पत्रकार परिषदा घेत होते. मात्र मनसेच्या संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये मात्र खंड पडला होता. आता ते संघटनात्मक कामात लक्ष घालणार असून त्यांनी यासाठी दौऱ्याची सुरूवात बालेकिल्ल्यापासून करण्याचे ठरविले आहे.
राज ठाकरे यांचा नाशिक दौरा राजकीय लक्षवेधी ठरणार आहे. कारण १६, १७ आणि १८ जुलै असे तीन दिवस ते नाशका मुक्काम ठोकून महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. यात नाशिकमधील सध्याची राजकीय स्थिती, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी, निवडणुकीसाठी व्यूहरचना यावर ते भर देणार आहेत. पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश, जुन्या बाहेर गेलेल्यांचा पुन्हा प्रवेश असे कार्यक्रम आखले जाऊ शकतात.
राज यांचा हा दौरा मनसेसाठी उत्साह वाढवणारा ठरणार असून अन्य पक्षांची अस्वस्थताही या दौऱ्याने वाढवणारा आहे. कारण भाजप आणि राष्ट्रवादी सारख्या पक्षात मनसेतून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले होते. ते आता आऊटगोइंगमध्ये बदलू शकते.
मनसेच्या स्थापनेपासून नाशिक हा मनसेचा गड राहिला आहे. महापालिकेत एकहाती सत्ता आणि तीन आमदार नाशिकने मनसेला दिलेले आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि काही नेत्यांचे आऊटगोइंग यामुळे नाशिकवरील वर्चस्व आज मनसेने गमावले असले तरी आगामी महापालिका निवडणुकीत या साऱ्याची परतफेड करून पुन्हा नाशिकचा गड भक्कम करण्याचा राज यांचा इरादा आहे. त्यासाठी पक्षाची नाशकात नव्याने बांधणी करण्यासाठी येत्या काळात काही कठोर निर्णयही राज घेतील अशी शक्यता असून या सर्वच पार्श्वभूमीवर त्यांच्या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more