राज ठाकरे गौतम अदानींवर पुराव्यांसह आरोप करणार म्हणून शिवाजी पार्कच्या सभेला शरद पवार गैरहजर??

नाशिक : मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या सभेत शरद पवारांचा तुतारीवाला डाव्या हाताला ठेवून राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी स्टेजवर शरद पवार नव्हते, तर त्यांचे प्रतिनिधी जयंत पाटील सभेला हजर होते. राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी जयंत पाटलांचेच भाषण तिथे झाले होते.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची प्रचंड जाहीर सभा शिवाजी पार्कवर झाली. या सभेला शिवशक्ती असे नाव देण्यात आले शिवसेना मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशा आघाडीची ही प्रचार सभा होती. त्यामुळे स्टेजवर शिवसेनेचे चिन्ह मशाल मनसेचे चिन्ह रेल्वेचे इंजिन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारीवाला माणूस ही स्टेजवर झळकत होती. सभेच्या मुख्य पोडियमवर सुरुवातीला मशाल चिन्ह होते. मध्ये मनसेचे इंजिन चिन्हा होते, तर डाव्या हाताला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तुतारीवाल्या माणसाचे चिन्ह होते. याच तुतारीवाल्या माणसाचे चिन्ह डाव्या हाताला ठेवून राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतले.

– शरद पवार का राहिले गैरहजर??

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आजच्या या सभेला शरद पवार स्वतःच येणार होते. पण त्यांना जमले नाही म्हणून त्यांनी मला सभेला जायला सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार मी सभेला आलो, असे जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटलांच्या भाषणानंतर राज ठाकरे यांचे भाषण झाले. पण राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने गौतम अदानी यांना टार्गेट केले, हे शरद पवारांना आधी माहिती झाले असल्यानेच ते शिवाजी पार्कवरल्या सभेला गैरहजर राहिले का??, असा गंभीर सवाल या निमित्ताने समोर आला.



– अदानींवर जोरदार तोंडसुख

राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच गौतम अदानी हे गेल्या 10 वर्षांत कसे श्रीमंत झाले, यांचे भारताच्या नकाशावरचे प्रेझेंटेशन करून केली. 2014 पासून 2024 पर्यंत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने एकट्या गौतम अदानींवर कृपा केली आणि त्या अदानींनी महाराष्ट्र सह संपूर्ण देश गिळला, असा आरोप नकाशा दाखवून केला. गेल्या दहा वर्षात गौतम अदानींनी संपूर्ण देशभरात दीडशे पेक्षा जास्त प्रकल्प उभे केल्याचे यातून दिसून आले. केंद्रातल्या मोदी सरकारने आणि राज्यातल्या फडणवीस सरकारने एकट्या अदानींवर जमिनींचा वर्षाव केला लाखो हेक्टर जमीन एकट्या अदानींना दिली आणि त्यांनी सगळीकडे गुजरात्यांचा प्रभाव निर्माण केला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

– सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांवर टीका

अजित पवारांच्या 70000 कोटींच्या घोटाळ्यावर सुद्धा राज ठाकरे यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घोटाळे संदर्भात आरोप केले होते बैलगाडी भरपूर पुरावे दिले होते पण आज तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसलेत. फडणवीसांना काही विचारले, तर सांगतात अजून केसेस सुरू आहेत मग तुमच्याकडे पुरावे होते ना, तर तुम्ही ते कोर्टात का नाही दिले??, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

– पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला अदानींची मदत

पण हे सगळे भाषण करताना राज ठाकरे हे शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातले संबंध विसरले. ज्या गौतम अदानींच्या यांच्यावर राज ठाकरे यांनी जोरदार तोंडसुख घेतले, त्या गौतम अदानींना जशी केंद्रातल्या मोदी सरकारने आणि राज्यातल्या फडणवीस सरकारने मदत केली, तशीच मदत शरद पवारांनी सुद्धा केली होती. गौतम अदानी यांच्याच कंपनीच्या सीएसआर फंडामधून त्यांनी 25 कोटी रुपयांचा निधी शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला दिला म्हणून शरद पवारांनी बारामतीत उभारलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरच्या उद्घाटनाला गौतम अदानी यांना बोलाविले होते. त्यावेळी अजित पवारांनी त्यांचे स्वागत केले होते, तर रोहित पवारांनी अदानींची गाडी चालवली होती. पण राज ठाकरे हे सगळे भाषण करताना विसरले आणि त्यांनी फक्त अदानी, मोदी आणि फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला.

Raj Thackeray targets Gautam Adani, therefore Sharad Pawar didn’t attend Shivaji park rally

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात