Raj Thackeray : मतदान गोपनीय, मतदार यादी गोपनीय कशी? राज ठाकरे यांचा सवाल, पत्रकार परिषदेत आयोगाला बरसले विरोधक

Raj Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज पुन्हा एकदा विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर बैठक झाली.Raj Thackeray

या बैठकीत ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी आयोगाकडे केली. तर मतदार याद्यांमधील घोळावरून शेकापचे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.Raj Thackeray



राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री

आता निवडणूक होणार, तर कशी होणार? हे महत्त्वाचे आहे. कोणबरोबर होणार हा आताचा विषय नाही. २०१७ ला पण मी हेच बोलत होतो, असे राज ठाकरे म्हणाले. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळेला अजित पवार पण होते. खरे तर आज त्यांनी यायला पाहिजे होते. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते, (यावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांनी मिमिक्री केली) या सगळ्या गोष्टी सांगत होते, असा टोला राज ठाकरे यांनी अजित पवारांना लगावला.

महायुतीच्या २३२ जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता – राज ठाकरे

निवडणूक याद्यांमध्ये घोळ आहेत. हे घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसमोर ठेवलेले आहेत. ते सुधारले पाहिजेत. ते सुधारून विरोधीपक्षाचे समाधान झाले पाहिजे. सत्ताधारी पक्षांचेही समाधान झाले पाहिजे. जे निवडणुका लढवतात, त्या राजकीय पक्षांचे समाधान झाल्याशिवाय आयोगाने निवडणुका घेऊ नयेत, ही आमची रास्त मागणी आहे. यात काहीच गैर नाही. निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा. त्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नयेत. ही सोपी गोष्टी आहे. त्यात काही कॉम्प्लिकेटेड नाहीये. आम्ही क्लिष्ट विषय बोलत नाहीयेत, असे राज ठाकरे म्हणाले.

मतदार याद्यांमधील घोळ निवडणूक आयोगासमोर ठेवल्यानंतर मला असे वाटते, ते आणि राजकीय पक्षांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत. याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २३२ जागा महायुतीच्या निवडून आल्यात. एवढ्या जागा निवडून आल्यानंतर देखील संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. जो जल्लोष व्हायला पाहिजे होता, तो नव्हता. हे कसले द्योतक आहे. निवडणुकीत पडलेल्यांना धक्का बसतोच, पण निवडून आलेल्यांना सुद्धा धक्का बसावा, ही कोणती निवडणूक आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचा जोक अन् उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ

राज ठाकरे म्हणाले की, 2024 मधील निवडणुकीची मतदार यादीमधील छोटासा तपशील वाचून दाखवतो. यामधून तुम्हाला किती घोळ आहे, याचा अंदाज येईल. मतदारसंघ कांदिवली पूर्व, नाव- धनश्री कदम, वडिलांचे नाव- दिपक कदम- वय 23 वर्षे…आता नाव दिपक कदम, वडिलांचे नाव-दिपक रघुनाथ कदम, वय-117 वर्षे…मतदार संघ 161 चारकोप- नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव- महेंद्र चव्हाण, वय-124 वर्षे, महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव- महेंद्र श्रीनाथ चव्हाण, वय-43 वर्षे…यावरुन कोणी कोणाला काढलंय हेच समजत नाहीये.

राज ठाकरेंच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंसह, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात सर्व हसले. उपस्थित पत्रकारांमध्येही एकच हशा पिकला.

२०२२ याद्यांमध्ये फोटो, २०२५ च्या याद्यांमधून फोटो गायब – राज ठाकरे

२०२२ मध्ये जिल्हा परिषदांच्या याद्यांमध्ये फोटो आणि नावासह सगळे आहे. पण २०२५ च्या याद्यांमध्ये फोटो काढून टाकलेत. हे सगळे निवडणूक आयोग स्वत: करतंय. पण हे का करतंय? पारदर्शकता आणत असल्याचे ते म्हणत असतील, तर या सगळ्या गोष्टी ते का आणि कशासाठी हा घोळ करत आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. या देशात या पहिल्या निवडणुका नाहीत. याआधी अनेक निवडणुका झाल्या. या आधीच्या निवडणुकांमध्ये असले विषय आले नाहीत. हे विषय हल्लीच का यायला लागलेत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक पानासाठी दोन रुपये द्यायचे, मग आम्ही पाने घ्यायची. म्हणजे त्यात पण कमाई.

मतदान गोपनीय असते, मतदार यादी गोपनीय कशी असेल? – राज ठाकरे

मतदार याद्या गोपनीय असतात, असे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितले. पण मला वाटतं मतदान गोपनीय असते ना? मतदार कसा गोपनीय असेल? दुसरी गोष्ट मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावता आणि ४५ दिवसांनंतर त्यांचे फुटेज डिलीट करता. जर निवडणूक आयोग बघू शकतो, तर आम्ही नाही का बघू शकत? निवडणूक आयोगाला निवडणुका लढवायच्या नाहीत, त्या आम्हाला लढवायच्या आहेत. निवडणूक आयोग लपवा-छपवी का करतंय? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवतच नसेल तर मला वाटतं की पहिला घोळ इथे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

वेबसाइटवरून याद्या गायब झाल्याबद्दल आयोगालाच काही माहिती नाही – राज ठाकरे

वृत्तवाहिनीवर खोट्या मतदार यादीची बातमी येते आणि सायंकाळी सहा वाजता ती गायब होते. त्या संपूर्ण बातमी आणि मतदार यादीबद्दल केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला काहीच माहीत नाही. आम्ही माहिती घेऊन सांगतो, असे आयोग म्हणाले. ती यादी त्यांच्या वेबसाइटवरून गायब झालीये. वृत्तवाहिनीवर दाखवल्यानंतर याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला माहिती नसेल, तर मग हे कोण करतंय? कोण काढतंय? आणि कोण घालतंय? ही बाब त्यांना विचारली गेली. त्यावर केवळ आम्ही चौकशी करून सांगतो, एवढेच निवडणूक आयोगाने सांगितले, असे राज ठाकरे म्हणाले.

आठ वेळा निवडून येणार मी कसा पडतो? याबाबत अनेकांना प्रश्न – बाळासाहेब थोरात

आठ वेळा निवडून येणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पडले कसे असा सवाल राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला होता. याबाबत बाळासाहेब थोरात यांना विचारले असता, अनेक प्रश्न सर्वांना शंकास्पद वाटतात. मलाच नाही, तर महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख लोकांना त्याबाबत शंका असल्याचे ते म्हणाले. मतदार याद्यांनुसार एक-एक घरात शेकड्याने लोक राहत आहेत. निवडणूक आयोगाने अंतिम उत्तर दिलेले नाही. काही सकारात्मक व्हावे अशी अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने आमच्याकडे वेळ मागितला नाही, मात्र गोंधळाच्या अवस्थेतील मतदार यादीवर निवडणुका निकोप नाही, ही वस्तुस्थिती आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Raj Thackeray Demands ‘Elections on Ballot If No VVPAT’, Questions EC on Voter List Secrecy; Mocks Ajit Pawar in Press Conference

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात