उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!

Raj Thackeray

नाशिक : भर उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!, असे आज घडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी त्यांना लाल गुलाबांचा गुच्छ भेट दिला. दोन्ही बंधूंनी गळा भेट घेतली त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर उभे राहून फोटोग्राफरना पोज दिली. Raj Thackeray

मातोश्रीवर असे लाल गुलाबांचे बंधूप्रेम फुलत असताना उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंचे समर्थक मोठ्या प्रमाणावर हजर होते. दोन्ही बंधूंच्या बरोबरच्या फोटोच्या फ्रेम मध्ये येण्यासाठी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. त्यामुळे संजय राऊत, अंबादास दानवे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, वैभव नाईक वगैरे नेत्यांचा समावेश होता.

हिंदीला विरोध आणि मराठीची सक्ती या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ते राजकीय दृष्ट्या कधी एक होणार?, याच्या चर्चा मराठी माध्यमांनी झडविल्या होत्या‌. पण या चर्चांना दोन्ही ठाकरे बंधूंनी दाद दिली नव्हती. राजकीय युती बद्दल उद्धव ठाकरे तीन-चार वेळा बोलले, तरी राज ठाकरेंच्या बाजूने त्याविषयी मौनच बाळगले गेले होते. उलट शिवसेनेबरोबरच्या युती विषयी कोणीही जाहीरपणे बोलू नये अशी तंबी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिली होती. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकीकरणाची चर्चा हळूहळू थंडावत गेली होती.

पण आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे तब्बल 18 वर्षांनंतर मातोश्रीवर पोहोचल्याने ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या चर्चेला पुन्हा हवा मिळाली. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर ठाकरे बंधू राजकीय युतीची घोषणा करणार, अशा अटकळी मराठी माध्यमांनी बांधल्या. दोन्ही बंधूंमध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा रंगल्याची बातमी आली. परंतु, राजकीय युतीची घोषणा न करता किंवा प्रत्यक्षात तसे काही न घडवता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देऊन, त्यांना लाल गुलाबांचा गुच्छ भेट देऊन त्यांच्याबरोबर फोटोसाठी पोज मातोश्री वरून निघून गेले.

ठाकरे बंधूंनी एकमेकांना भर उन्हाळ्यात व्हॅलेंटाईनचे गुलाब दिले होते, पण त्यावेळी त्या गुलाबाला काटेच फार होते. आज मात्र श्रावण मासाच्या सुरुवातीलाच त्या गुलाबांचे काटे झडून गेले आणि मातोश्रीच्या दारात लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले, असे दिसून आले.

Raj Thackeray birthday wish to uddav Thackrey

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात