राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त भेटीसाठी येणाऱ्या मनसैनिकांना केलं ‘हे’ आवाहन

Raj Thackeray Criticizes Thackeray government over ward system in local body elections decision

‘’तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे’’ असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कायम चर्चेतील आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. मनसैनिकांसाठी तर राज ठाकरे हेच सर्वस्व आहेत. अशावेळी त्यांचा वाढदिवस म्हणजे मनसैनिकांसाठी मोठा सणच असतो. राज्यभरातील मसैनिक या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात, तर मनसेचे नेते, पदाधिकारी हे राज ठाकरेंची प्रत्यक्ष भेट घेऊन, त्यांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या  शुभेच्छाही देतात.  याच  पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवसाअगोदर राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक आवाहन केले आहे. Raj Thackeray appealed to the MNS workers to visit him on the occasion of his birthday

राज ठाकरे आपल्या फेसबुकपेजवरील पोस्टद्वारे म्हणतात, ‘’माझ्या महाराष्ट्र सैनिकांना,  सस्नेह जय महाराष्ट्र … दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका.’’

याशिवाय ‘’तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.  सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० ह्या वेळेत मी उपस्थित असेन.तेंव्हा भेटूया १४ जूनला. आपला नम्र, राज ठाकरे’’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray appealed to the MNS workers to visit him on the occasion of his birthday

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात