Raj Thackeray : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले, तळपायाची आग मस्तकात गेली, ते सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!

Raj Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. तसेच दुबार मतदार दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार केले आहे. त्यानुसार, ज्या मतदारांची दुबार नावे आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी टीका केली आहे.Raj Thackeray

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले, आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली! आणि आता 100 टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.



 

दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.

निवडणूक आयोग मालकाच्या सांगण्याप्रमाणे वागतंय- अनिल परब

अनिल परब म्हणाले, ते म्हणतात की दुबार मतदारांच्या नावावर स्टार करणार. स्टार करणार म्हणजे काय, त्या माणसाला विचारणार, आता ही माणसे यांना सापडणार कशी? याची प्रोसेस काय हे कोणालाही माहित नाही. कशा पद्धतीने याला रोखणार, याचे काहीच उत्तर नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने काम पुढे रेटण्याचे काम केले आहे. या निवडणूक आयोगाचे जे मालक आहेत, भारतीय जनता पक्ष हे त्यांचा अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील. हे फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचे काम करत आहेत, की आम्ही अशी कारवाई करू, ते करू. मुळात कोणतीही कारवाई ते करणार नाही.

Raj Thackeray Angered Election Commission Press Conference Puppet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात