विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा वेगवेगळ्या अॅप्सवर अश्लिल व्हिडीओ अपलोड करायचा. यातून त्याला प्रचंड पैसे मिळत होते.अभिनेत्री आणि मॉडेल्सना वेब सिरीजच्या शुटींगच्या नावाखाली बोलवले जायचे असेही पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे.Raj Kundra used to upload pornographic videos on various apps, calling actresses under the name of web series shooting
कुंद्राने लंडनमधील त्याची कंपनी चालवणाºया प्रदीप बक्षीशी व्हॉटसअॅपवर केलेले संभाषण पोलीसांच्या हाती लागले आहे. त्या चॅटमध्ये राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी प्रदीप बक्षी यांच्यामधील संभाषणामध्ये राज कुंद्रा प्रदीप बक्षीशी दर आठवड्याला असा चित्रपट रिलीज करण्याविषयी बोलत होता.
व्ही चॅटच्या माध्यमातून पाठवून लंडनमधून वेगवेगळ्या अॅप्सवर अश्लीलतेचे व्हिडीओ अपलोड करायचे. असे व्हिडिओ बनवून काही वेबसाईट्स आणि ओटीटी प्लेटफॉर्मसाठी विकले जात होते. या वेबसाईट्स आणि अप्लिकेशनच सबस्क्रिप्शन घेऊन मेम्बरशीप दिली जात होती.
या संभाषणामध्ये दैनंदिन उत्पन्न वाढणाºया ग्राहकांचा उल्लेखही आहे. राज कुंद्रा या ग्रुपमध्ये दररोज सर्व तपशील घेत असत की, किती नफा झाला, किती तोटा होतो आणि व्यवसाय कसा वाढवता येतो, यावर चर्चा करत. दिवसाच्या कमाईचा हिशेबही ठेवला जात असे.
फेब्रुवारी महिन्यात वेब सीरीज बनवण्याच्या नावाखाली अश्लील चित्रपटांच्या शूटिंगच्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेने पदार्फाश केला होता. त्यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हाच हे चॅट रिट्रीव्ह केले होते. राज कुंद्राशी संबंधित या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 5 सदस्य होते. यामध्ये त्या सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत की, कोणती नायिका कधी बोलावायची, काय करायचे. त्यांच्याशी व्यवहार कसे करावे.
त्यांना काय म्हणाचे आणि शूटसाठी त्यांना केव्हा कॉल करायचा. पोर्नोग्राफीमध्ये काम करणाºया अभिनेत्रीच्या पैशांच्या व्यवहाराचा पूर्ण उल्लेखही या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नोंदवला गेला आहे. राज कुंद्रा या चॅटमध्ये माकेर्टींगची रणनीती, वाढती विक्री, मॉडेल्सचे पेमेंट आणि इतर सौद्यांविषयी बोलले जात असे. या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव एच अकाउंट्स होते. राज कुंद्राच्या अटकेमध्ये हे व्हॉट्सअॅप चॅट मुख्य कारण ठरले.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता.
ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा टाकल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणाचा पदार्फाश झाला होता. या प्रकरणी क्राईम ब्रॅँचने राज कुंद्राला अटक केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने या अश्लील चित्रफिती शूट केल्या जायच्या आणि विकल्या जायच्या, याची मोडस ऑपरेंडीच सांगण्यात आली आहे.
क्राईम ब्रांचकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नवोदित महिला कलाकारांना वेब सीरिजमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट स्टोरीजमध्ये ब्रेक देतो असं सांगून बोलावलं जायचं. ऑडिशन, शॉट्स घेण्यासाठी बोलावलं जायचं. त्यात बोल्ड सीन्स करावे लागतील असं सांगितलं जायचं. नंतर त्या बोल्ड सीन्सचं पर्यवसान सेमी न्यूड आणि न्यूड सीन्समध्ये व्हायचे. त्यावर या महिला कलाकार आक्षेप घ्यायच्या. अशा काही महिला कलाकारांनी पोलीसांकडे तक्रारही केली होती.
या प्रकारे छोट्या क्लिप्स, शॉर्ट फिल्म्स काही वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या. यात ९ आरोपी आधीच अटकेत आहेत. त्यात रोहा खान, गेहेना वशिष्ट, तन्वीर हाशमी, उमेश कामत आणि इतरही काही आरोपी अटकेत आहेत. यातले काही प्रोड्युसर देखील आहेत. त्यांचे वेगवेगळे अॅप्स आणि वेबसाईट असायच्या. तिथे या क्लिप्स विकल्या जायच्या.
जे अॅप्स सापडले, त्याच्या तपासात असं समोर आलं की उमेश कामत नावाचा व्यक्ती हा इंडिया हेड आहे. राज कुंद्रा यांच्या कंपनीत तो भारतातील कामकाज बघायचा. राज कुंद्रा यांच्या वियान कंपनीचं केनरीन नावाच्या कंपनीशी टायअप आहे. ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्रा यांच्या बहिणीचे पती त्या कंपनीचे मालक आहेत.
या कंपनीचं हॉटशॉट्स नावाचं अॅप होतं. ही कंपनी जरी लंडनमध्ये असली, तरी त्याचा कंटेंट तयार करणं, त्याची व्यवस्था पाहणं हे मुंबईतून वियान कंपनीमधूनच केले जायचे. हॉटशॉट्सवरच्या काही चित्रफीत देखील सापडल्या आहेत. न्यायालयाच्या परवानगीने त्यांच्या ऑफिसमध्ये शोध घेतल्यानंतर हे सर्व साहित्य सापडले.
हॉटशॉट्स नावाच्या अॅपवर पॉर्नोग्राफीक कंटेंट असल्यामुळेच अॅपल स्टोअरने जून २०२०मध्ये काढून टाकलं होतं. नोव्हेंबर २०२०मध्ये गुगल प्लेस्टोअरने देखील हे अॅप काढलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App