अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्याशी संबंधित पॉर्नोग्राफीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मोठा छापा टाकला. मुंबईतील वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून यामध्ये एका कास्टिंग डायरेक्टरचाही राजच्या कंपनीशी संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात राज कुंद्राला 20 सप्टेंबर रोजी जामीन मिळाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्प यांच्याविरुद्ध 1500 पानांचे चार्टशीट न्यायालयात दाखल केले होते आणि ते दोघेही या पॉर्नोग्राफी रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. Raj Kundra case: 4 arrested, including casting director by Mumbai Crime Branch, in pornography case
वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्याशी संबंधित पॉर्नोग्राफीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मोठा छापा टाकला. मुंबईतील वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून यामध्ये एका कास्टिंग डायरेक्टरचाही राजच्या कंपनीशी संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात राज कुंद्राला 20 सप्टेंबर रोजी जामीन मिळाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्प यांच्याविरुद्ध 1500 पानांचे चार्टशीट न्यायालयात दाखल केले होते आणि ते दोघेही या पॉर्नोग्राफी रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.
या चौघांवरही मॉडेल्सकडून जबरदस्तीने पॉर्न फिल्म शूट केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे नरेश कुमार रामावतार पाल, सलीम गुलाब सय्यद, अब्दुल गुलाब सय्यद, अमन सुभाष बर्नवार अशी आहेत.
Raj Kundra pornography case | Four more persons including a casting director arrested, from Versova and Borivali areas, says Mumbai Police Crime Branch — ANI (@ANI) February 22, 2022
Raj Kundra pornography case | Four more persons including a casting director arrested, from Versova and Borivali areas, says Mumbai Police Crime Branch
— ANI (@ANI) February 22, 2022
पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलै रोजी अटक केली होती. तत्पूर्वी त्याची कित्येक तास चौकशी करण्यात आली. राजचा आयटी सहकारी रायन थॉर्प यालाही दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० जुलैला अटक करण्यात आली होती. राजच्या अटकेनंतर काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्या होत्या, ज्यावरून राजने पॉर्न फिल्म बनवण्याच्या व्यवसायातून चांगली कमाई केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या चित्रपटांमधून दररोज 8 लाखांची कमाई करत असे.
नुकतीच बातमी आली होती की, राज कुंद्राने त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर 5 फ्लॅट ट्रान्सफर केले आहेत. वृत्तानुसार, राज कुंद्राने मुंबईतील किनारा या बंगल्याचा संपूर्ण पहिला मजला पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्राच्या नावावर हस्तांतरित केला आहे, ज्यात 5 फ्लॅट आहेत. या मालमत्तेची किंमत 38.5 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा बंगला समुद्रकिनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर बांधला आहे. राज कुंद्रा यांच खरे नाव रिपू सुदान कुंद्रा आहे. सध्या या बंगल्यात शिल्पा आणि राज कुंद्रा राहतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App