वृत्तसंस्था
मुंबई : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. Raigad, Sindhudurg, kolhapur, satara, ratnagiri, pune discticts has in threat of corona; Medical experts warn
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतु, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या सहा जिल्ह्यांत अजूनही पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
प्रशासकीय यंत्रणा या जिल्ह्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांकडूनच गृह विलगीकरण तसेच नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. अनेक जण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली घराबाहेर पडत आहेत. दंडात्मक कारवाई करूनही अकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी आणायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सरासरी ११ हजार ३० दैनंदिन रुग्णांची नोंद होते आहे. ७ ते १३ जूनदरम्यान राज्यात ७७ हजार २११ रुग्णांची नोंद झाली, तर त्यापूर्वी ३० मे ते ६ जूनदरम्यान १ लाख ३ हजार ४८९ रुग्ण आढळले आहेत. या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या १४ हजार ७८४ आहे.
मुंबई, नाशिकमध्ये खबरदारीसाठी निर्बंध
कोरोना टास्क फोर्सचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, राज्यात २० हून अधिक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्ववत झाले आहे. मुंबई, नाशिकसारख्या शहरातील साथ आटोक्यात आली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध कठोर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App