खूनाच्या घटनेनंतर झाला होता फरार; पोलिसांनी सापळा रचून पकडले
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावत उत्तीर्ण होत वन परिक्षेत्र अधिकारी पद मिळवणाऱ्या दर्शना पवार(वय-२६) या तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता, या खूनाच्या घटनेनंतर दर्शना सोबत गेलेला तिचा मित्र राहुल हांडोरे हा फरार झाला होता, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. Rahul Handore the suspect in the Darshana Pawar murder case is finally in police custody
पुणे ग्रामीण पोलिसांनी संशयित राहुल हंडोरे यास मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना सापळा रचून अटक केली. त्यामुळे आता दर्शना पवार खून प्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दर्शना पवार हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. दर्शना आणि तिचा मित्र राजगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. या घटनेनंतर दर्शनाचा मित्र पसार झाला असून त्यानेच तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App