वंदेमातरम वरच्या चर्चेवर राहुल गांधींचे No comments; पण पत्रकारांशी कुत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय अभिमानाचे गीत वंदे मातरम वरच्या चर्चेवर राहुल गांधींचे No comments, पण पत्रकारांशी कुत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा!!, असे चित्र संसदेच्या आवारातून आज समोर आले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी आपला पाळीव कुत्रा घेऊन संसदेच्या आवारात आल्या होत्या. त्यांना सुरक्षारक्षकांनी कुत्रा आत मध्ये न्यायला परवानगी नाकारली. त्यावर कुत्र्याच्या भुंकण्यावर संसदेच्या बाहेर बंदी आहे, पण संसदेत आत मध्ये कुणीही भुंकू शकते, अशी अश्लाघ्य टिप्पणी रेणुका चौधरी यांनी केली.

राहुल गांधींनी आज संसदेच्या आवारात कुत्र्याच्या मुद्द्यावर पत्रकारांशी चर्चा केली. पण त्याआधी पत्रकारांनी त्यांना सरकार वंदे मातरम च्या मुद्द्यावर चर्चा करून इच्छिते, यावर तुमचे मत काय??, असा सवाल केला त्यावर सध्या मी त्या विषयावर बोलू इच्छित नाही, असे सांगून राहुल गांधींनी वंदे मातरमचा विषय टाळला.

प्रियांका गांधींनी सुद्धा उत्तर टाळले

त्याआधी प्रियांका गांधींना सुद्धा पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला होता परंतु त्यांनी सुद्धा दिल्लीतल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर मतदार यादीच्या मुद्द्यावर सरकार उत्तर देत नाही. पंतप्रधान बोलत नाहीत. पंतप्रधान दिल्लीतली हवा चांगली आहे म्हणतात, अशी टीका टिप्पणी केली, पण वंदे मातरमचा प्रश्न विचारताच त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळून प्रियांका गांधी तिथून निघून गेल्या.

त्यानंतर राहुल गांधी समोर आले. त्यांनी पत्रकारांची कुत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. इथे पाळीव कुत्र्यांना आणायची परवानगी नाही का??, असा सवाल त्यांनी पत्रकारांना विचारला. पण आत मध्ये सगळ्याला परवानगी आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. या संवादाच्या आधी पत्रकारांनी राहुल गांधींना वंदे मातरम वरच्या चर्चेबद्दलच प्रश्न विचारला होता. परंतु त्यावर no comments असे उत्तर देऊन त्यांनी तो विषय टाळला. संचार साथी या मुद्द्यावर लोकसभेत बोलू, असे ते म्हणाले. सध्या देश कुत्र्यासारख्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा करतोय अशी टिप्पणी करायला सुद्धा ते विसरले नाहीत, पण वंदे मातरमच्या चर्चेवर उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात