विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि कॉंग्रेसचा खरा चेहरा परदेशातील त्यांच्या वक्तव्याने समोर आला आहे. राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोलले आहेत, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केला.
राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपविणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर हल्ला चढविताना फडणवीस म्हणाले, एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह सेट करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट करायची हे अतिशय चुकीचे आहे. संविधानाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कॉंग्रेसने कधीही सन्मान केला नाही, केवळ मतासाठी कशाप्रकारे ते खोटा नरेटिव्ह सेट करतात हे राहुल गांधी यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत.
गृह मंत्री अमित शहा यांनीही राहूल गांधींवर टीका केली आहे. शाह यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी अमेरिकेत केलेल्या विधानांच्या संदर्भात त्यांना व काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. “देशविरोधी बोलणं आणि देशाला तोडणाऱ्यांच्या बरोबरीने उभं राहणं ही राहुल गांधी व काँग्रेसची सवयच झाली आहे. मग तो जम्मू-काश्मीरमध्ये जेकेएनसीच्या देशविरोधी व आरक्षणविरोधी अजेंड्याला समर्थन देणं असो किंवा मग विदेशातील व्यासपीठांवर भारताच्या विरोधात बोलणं असो, राहुल गाँधींनी देशाची सुरक्षा व भावनांना कायम धक्का पोहोचवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App