Rahul Gandhi : हरियाणा हातचे गमावले, महाराष्ट्र गमावण्याचा धोका; राहुल गांधी सावधपणे ॲक्शन मोडवर!!

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हाता तोंडाशी आलेले हरियाणा राज्य विधानसभा निवडणुकीत हातचे गमावले, महाराष्ट्र गमावण्याचाही धोका समोर दिसतोय म्हणून लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी ॲक्शन मोडवर आले. त्यांनी आजच (ता.14) महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली असून त्यामध्ये ते महाराष्ट्रातली रणनीती फायनल करण्याची शक्यता आहे. हरियाणातला ताज्या पराभवाचा अनुभव लक्षात घेऊन काँग्रेस महाराष्ट्रासाठी रणनीतीत काहीसा बदल करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि जागावाटप हे दोन वादग्रस्त मुद्दे लवकरात लवकर सोडवण्याचा राहुल गांधींचा इरादा आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तम यश मिळवल्यानंतर काँग्रेस महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्रीपदावर काँग्रेस दावा करत आहे, पण उद्धव ठाकरे देखील माघार घ्यायला तयार नाहीत. शरद पवारांचे राष्ट्रवादी मुळातच तिसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांचा मुख्यमंत्री पदाचा छुपा किंवा उघड दावा काँग्रेस आणि शिवसेनेने मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


Salman Khan : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कारण बनली सलमान खानशी जवळीक?


या पार्श्वभूमीवर राहुल गांधी महाराष्ट्रातल्या नेत्यांची बैठक घेत असून त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आदी महत्त्वाचे नेते सामील होणार आहेत. या नेत्यांना राहुल गांधी विशिष्ट भूमिका समजावून सांगून महाविकास आघाडी टिकवण्याच्या दृष्टीने काँग्रेस नेत्यांनी कोणती रणनीती आखली पाहिजे याविषयी मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

राहुल गांधींच्या मार्गदर्शनानंतर महाराष्ट्रातले काँग्रेस नेते महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्यापुढे झुकणार की आपली आक्रमक भूमिका कायम ठेवणार??, त्याचबरोबर जागा वाटपात आणि मुख्यमंत्री पदाच्या मागणीत आपला वरचष्मा कायम राखणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Rahul Gandhi Haryana loss but Maharashtra losses

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात