Bawankule : राहुल गांधींची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे जिवंत उदाहरण; चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

Bawankule

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Bawankule राहुल गांधी यांची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे, नैराश्याचे आणि त्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे भाजपचे नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे मोदी, ‘शो’ नाहीतर ‘विकासाचा रोड शो’ असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत त्यांच्यासाठी ‘गुब्बारा’ शब्द वापरला होता. यावरुन बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.Bawankule

या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, जनतेने निवडणुकीत 10 वेळा तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ फोडला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. देशाच्या 140 कोटी जनतेनं सलग तिसऱ्यांदा मोदीजींवर विश्वास ठेवला, पूर्ण बहुमत दिलंय. त्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरणं म्हणजे लोकशाहीचा, जनतेचा अपमान असल्याचा आरोप देखील बावनकुळे यांनी केला आहे.Bawankule



चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…

राहुल गांधी यांनी कायम लक्षात ठेवायला हवे की, आदरणीय मोदीजी ‘शो’ नाहीत, ते ‘विकासाचा रोड शो’ आहेत. मोदीजी म्हणजे दिशा तर राहुल गांधी म्हणजे दिशाभूल हे देशातील जनतेनं ओळखले आहे. तुम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासाठी ‘गुब्बारा’ हा शब्द वापरताय पण जनतेने निवडणुकीत 10 वेळा तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ फोडला आहे.

राहुल गांधी, हा देश तुमच्या भाषणांवर चालत नाही. तो आकड्यांवर, कामांवर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भक्कम झेप घेतली आहे. देशातील तब्बल 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून वर काढण्यात यश मिळालं आहे. केंद्रातील मोदी सरकारने 80 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. ही फक्त आकडेवारी नाही, तर कोट्यवधी कुटुंबांच्या आयुष्यात घडलेली क्रांती आहे.

देशाच्या 140 कोटी जनतेनं सलग तिसऱ्यांदा मोदीजींवर विश्वास ठेवला, पूर्ण बहुमत दिलंय. त्या नेत्याबद्दल अशी भाषा वापरणं म्हणजे लोकशाहीचा, जनतेचा अपमान आहे. राहुल गांधी, तुमची टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचं, नैराश्याचं आणि त्यांच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे.

Bawankule: Rahul Gandhi’s Criticism Shows Political Immaturity

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात