विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : Radhakrishna Vikhe Patil, भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर प्रखर टीका केली आहे. समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे. तसेच 1994 साली जर शरद पवारांनी मराठा समाजाचा समावेश केला असता, तर आजची परिस्थिती नसती, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.Radhakrishna Vikhe Patil,
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बुलढाणा दौऱ्यावर असून त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण संदर्भात सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. सध्या हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम सुरू आहे. मात्र, मला ओबीसी बांधवांना हा प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला आरक्षण देताना मराठा बांधवांनी कधी विरोध केला होता का? 1994 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे पाप करून ठेवले आहे. त्याचवेळी जर मराठा समाजाचा समावेश केला असता तर आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष राहिला नसता. या पापाचे धनी कोण? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी शरद पवार साहेबांना विचारायला हवे, असे राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटले.Radhakrishna Vikhe Patil,
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय
यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. संजय राऊत हा बांग देणारा कोंबडा आहे. त्यांच्या पक्षाने त्यांना दररोज सकाळी बांग देण्यासाठी ठेवले आहे. सामना हा पेपर फार जास्त लोक वाचत नाहीत. त्यामुळे सामना काय म्हणतो याला महत्त्व नाही. सरकारने शेतकऱ्यांना भरीव पॅकेज दिले असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
घायवळ प्रकरणी काय म्हणाले विखे पाटील?
दरम्यान, सध्या पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या भावाला सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राहधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सचिन घायवळ हा काय व्यक्ती आहे, तुम्हाला माहीत नाही. जर पोलिसांनी त्याची शिफारस केली असेल किंवा नसेल. या परिस्थितीवर गृहराज्य मंत्र्यांनी खुलासा केला आहे. विरोधकांचे काम एकच आहे, फक्त काही झाले तर राजीनामा मागणे, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App