विशेष प्रतिनिधी
मुंबई : Radhakrishna Vikhe Patil भाजपचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शेतकरीविरोधी वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी सोसायटी काढायची, मग कर्ज घ्यायचं, नंतर ते माफ करून घ्यायचं आणि पुन्हा नवीन कर्ज मागायचं, हे वर्षानुवर्षं सुरू आहे, असं विधान विखे पाटील यांनी केल्याने शेतकरी संघटनांकडून आणि विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.Radhakrishna Vikhe Patil
सोशल मीडियावरही त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विखे पाटील यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली असून, किसान सभेचे नेते अजित नवले यांनी त्यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे. विखे पाटील शेतकऱ्यांना दोष देत आहेत, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणांचे फळ आहे, असा हल्लाबोल नवले यांनी केला. ते म्हणाले, सरकार आयात-निर्यात धोरणांमध्ये सातत्याने बदल करत आहे, त्यामुळे बाजारातील भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. शिवाय, पीक विमा कंपन्यांचे नफे वाढवले जातात, पण शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.Radhakrishna Vikhe Patil
मंत्री बावनकुळेंकडून सारवासारव
दरम्यान, या वादावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी सारवासारव केली. त्यांनी सांगितलं की, विखे पाटील यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता. त्यांना म्हणायचे की शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ व्हावे आणि भविष्यात पुन्हा शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर निर्माण होऊ नये, याची खबरदारी घ्यावी.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App