विशेष प्रतिनिधी
नाशिक : Radhakrishna Vikhe Patil गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेली गोदावरी संवर्धन परिषद नाशिक मध्ये यशस्वी पार पडली. यावेळी गोदावरी खोरे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गोदावरी आणि पर्यावरणवादी यांनी गोदावरी नदीच्या समस्या मांडून त्यावर मंथन केले.Radhakrishna Vikhe Patil
या मंथनामध्ये गोदावरी नदीच्या समस्या आणि त्याचे निराकरण कसे होऊ शकते, यावर तीन सत्रांत चर्चा झाली. डॉ. सुनील कुटे, डॉ. विप्लव पटनायक तसेच डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी आपली प्रेझेंटेशन्स दिली. त्यामध्ये गोदावरीची प्रदूषण समस्या व त्यावरील दीर्घकालीन उपाय योजना यावर विशेष भर होता.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी सदस्य चिराग पाटील आणि दीपक भगत यांनी गोदावरीची प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद रमेश पांडव यांनी भूषविले. प्रमुख अतिथी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी स्वच्छता या विषयावर आपले उद्बोधन दिले.
नाशिकचे गोदाप्रेमी अंबरीश मोरे, स्नेहल देव, मनोज साठे, तिवारी, चंद्रकिशोर पाटील, राजेश पंडित आणि देवांग जानी यांनी गोदावरी संदर्भात अनुभव कथन केले. या कार्यक्रमासाठी शिवाजीभाऊ बोंदार्डे, शैलेश देवी, नरसिंह कृपादास, चैतन्य आदी सर्व गोदासेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App