2024 च्या निवडणुका तोंडावर, त्यांची तयारी राहिली लांब, 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकार पाडले कुणी??, यावरूनच वाद सुरू!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : 2024 च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपले आहेत पण त्यांची तयारी करणे राहिले लांब, तर 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार पाडले कुणी आणि का यावरूनच महाराष्ट्रात वाद सुरू झाला आहे. Qural erupted in 2023 over pulling down of prithviraj chavan government in 2014 @ the doorsteps of 2024 elections

सहकार क्षेत्रात काही कडक निर्णय घेतल्यामुळे अर्थात राज्य सहकारी बँकेवर कायदेशीर कारवाई केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सरकार पाडले, असा ठपका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांवर ठेवला. स्वतः पवार यांनी त्यावर मौन बाळगले. अद्याप पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवलेल्या ठपक्याचे उत्तर दिले नाही. पण सध्या शरद पवारांपासून बाजूला गेलेले सुनील तटकरे यांनीच त्याचे पहिले प्रत्युत्तर दिले.

पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रातल्या काँग्रेस नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची सुपारी देऊन महाराष्ट्रात पाठवले होते. ते काम त्यांनी केले. त्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, असा आरोप सुनील तटकरे यांनी केला, या आरोपाला प्रफुल्ल पटेल यांनी देखील दुजोरा दिला.

पण हे दोन्ही आरोप स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडून काढले. कुणाला सुपारी द्यायला केंद्रातले काँग्रेसचे नेते काय रिकामे आहेत का?? अशी कुठलीही सुपारी मला कुणीही दिली नव्हती. मी जी काही केली, ती कायदेशीर कारवाई केली. त्यामुळे राष्ट्रवादीने माझे सरकार पाडले, असा पुनरुच्चार करून पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा शरद पवारांना टार्गेट केले.

एकीकडे पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते यांच्यात राजकीय भांडण जुंपले असताना, त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले पण सध्या भाजपचे मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील त्या भांडणात मध्ये पडले. पृथ्वीराज चव्हाण यांनीच काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार घालविले. काँग्रेसच्या नुकसानीसाठी पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार आहेत, असा आरोप विखे पाटलांनी केला.

एकूण 2024 ची लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार नेमके कोणी आणि का पाडले??, यावरून हे भांडण सुरू आहे. भांडण करणाऱ्या नेत्यांपैकी कोणालाच प्रत्यक्ष 2024 च्या लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकांची स्वबळावर तयारी करायची नाही. स्वतः पृथ्वीराज चव्हाण, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि राधाकृष्ण विखे पाटील हे आजही त्यांच्या पक्षांमध्ये दुसऱ्याच फळीचे नेते आहे. ते पहिल्या फळीचे नेते नाहीत. त्यामुळे मुख्य निर्णय घेणारे हे नेते नव्हेत.

मुख्य निर्णय काँग्रेसमध्ये गांधी परिवार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवार आणि त्यांचे मार्गदर्शक भाजप पक्षश्रेष्ठी आणि राधाकृष्ण विखे पाटील सध्या भाजपमध्ये असल्यामुळे त्यांच्या संदर्भातला निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी हेच घेणार आहेत. पण भांडण या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये सुरू झाले आहे आणि त्यात पृथ्वीराज चव्हाण केंद्रस्थानी आहेत. त्यांचे सरकार पाडणारे शरद पवार गप्प आहेत.

Qural erupted in 2023 over pulling down of prithviraj chavan government in 2014 @ the doorsteps of 2024 elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात