विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री संत नामदेव महाराज यांच्या ७५५ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.Punjab and Maharashtra are states connected by culture; Eknath Shinde awarded Sant Namdev Award in Ghuman
कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पहाटे त्यांना विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा सौभाग्य लाभले, तर संध्याकाळी भगवान संत शिरोमणी नामदेव बाबांचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले. तसेच या ठिकाणी आपण मला ‘बाबा नामदेव सन्मान पुरस्कार’ देऊन गौरवल्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार मानले. राजकीय जीवनात आजवर मला अनेक पुरस्कार मिळाले असले, तरीही आज मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार असल्याचे याप्रसंगी विनम्रपणे नमूद केले.
काही दिवसापूर्वी मला दिल्लीत महादजी शिंदे पुरस्कार मिळाला, देहू येथे संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला, त्यानंतर पंढरपुरात संत नामदेव महाराज पुरस्कार मिळाला, तर आज घुमान येथे बाबा नामदेव पुरस्कार आपण मला दिलात याहून सौभाग्याची बाब दुसरी असूच शकत नाही.
पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यात अनेक बाबतीत साम्य आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी आहे, तर पंजाब ही गुरू गोविंद सिंह यांची पावन भूमी आहे. या दोन्ही भूमीला शूरवीरांचा वारसा आहे. पंजाब मध्ये भगतसिंह होते, तर महाराष्ट्रात राजगुरू होते. तसेच महाराष्ट्रातील नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये येऊन मोठे कार्य केले त्यामुळे संस्कृतीने जोडली गेलेली ही दोन राज्य असल्याचे यावेळी सांगितले.
मी इथे पहिल्यांदाच येत असलो तरीही आता वारंवार यावे लागेल, अमृतसर ते घुमान चार पदरी रस्त्याचा प्रश्न नक्की मार्गी लावू, इथे देशभरातून पर्यटक यावेत यासाठी प्रयत्न करू तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ असे याप्रसंगी अधोरेखित केले. तसेच येथील संत श्री नामदेव महाराज महाराष्ट्र सदनासाठी पंजाब सरकारने दोन एकर जमीन दिल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे विशेष आभार मानले. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ, सरहद्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि बाबा नामदेव संस्थानचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शीख बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App