औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांधांना वेळीच चाप लावा; संभाजी राजेंची मागणी

प्रतिनिधी

कोल्हापूर : नगरच्या फकीरवाड्यात संदलच्या निमित्ताने एमआयएमच्या म्होरक्यांनी औरंगजेब नाचवला. शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचे मोबाईल स्टेटस ठेवले. त्यानंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी कडकडीत बंद पुकारला. त्याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला काही. काळ तिथे तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन केले. Punish the fanatics who glorify Aurangia in time

या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावा, अशी मागणी केली आहे. कोल्हापूर मधल्या परिस्थितीबद्दल संभाजी राजे यांनी एक ट्विट केले आहे.

या ट्विटर मध्ये संभाजी राजे म्हणतात :

शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे.

कोल्हापुरात हिंदू समाजाचा कडकडीत बंद, पण पवार विचारतात, औरंगजेबाचे पोस्टर दाखविणे हा काय आंदोलनाचा विषय आहे??

छत्रपती संभाजीनगर : नगरच्या फकीरवाड्यात संदलच्या कार्यक्रमात एमआयएमच्या म्होरक्यांनी औरंगजेबाचे पोस्टर नाचविले. नगरसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली एमआयएमच्या चार म्होरक्यांविरुद्ध गुन्हे देखील दाखल झाले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र औरंगजेबाचे पोस्टर दाखविणे हा काय आंदोलनाचा विषय आहे का??, असा सवाल करून तो विषयच डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न केला.

इतकेच नाही तर कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद पाळला. त्यावर देखील औरंगजेबाचे पोस्टर दाखवल्यामुळे पुण्यात किंवा बाकीच्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी रस्त्यावर उतरणे योग्य नाही, असे वक्तव्य पवारांनी केले.

– म्हणे, लव्ह जिहादला फाजील महत्त्व नको

लव्ह जिहाद हा प्रश्न महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा राज्यात अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लव्ह जिहाद सारख्या मुद्द्यांना मीडियाने फाजील प्राधान्य देऊ नये, अशी शेरेबाजी देखील शरद पवारांनी केली. लव्ह जिहाद विरोधात महाराष्ट्राचा संपूर्ण देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हिंदू समाज संतप्त झाला आहे. उत्तरकाशी मध्ये लव्ह जिहाद फैलावणाऱ्या दुकानदारांना हिंदू समाजाने धडा शिकवला आहे, तर महाराष्ट्रात संगमनेर मध्ये हिंदू समाजाने कालच प्रचंड मोर्चा काढला होता. तरी देखील शरद पवारांनी लव्ह जिहाद हा प्रश्न गंभीर नाही. त्याला फाजील महत्त्व देऊ नका, असे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज यांच्या विरोधात द्वेष फैलावला जातो आहे. त्यांना संरक्षणाची गरज आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजे यांनी केलेले ट्विट विशेष महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी त्यात थेट औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर अशी कठोर कारवाई करा की त्यांची पुन्हा तसे करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.

Punish the fanatics who glorify Aurangia in time

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub