विशेष प्रतिनिधी
पुणे : सर्वसामान्य नागरिकांमध्ये भरडधान्य म्हणजेच पौष्टिक तृणधान्य यांचं महत्त्व अधोरेखित व्हावं… ती सगळी भरडधान्य सर्वसामान्यांना माहिती व्हावीतं या उद्देशाने पुणे शहरात सामाजिक संस्थांच्या मदतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवला गेला .. Pune’s Some Social Organisations are Celebrate The International Millet Year…
निसर्गसूत्र, बायोस्फिअर्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा वनस्पती शास्त्र विभाग, बायफ रिसर्च फाऊंडेशन, आणि तळजाई माता देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार जागतिक वसुंधरा दिन,आणि अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या (इंटरनेशनल मिलेट ईयर) निमित्तानं पुणे शहरातील तळजाई मंदिर प्रांगणात, भरडधान्य-लक्ष्मी बीज-चित्र साकारण्यात आलं
या भरड-धान्यलक्ष्मी बीज चित्राचं अनावरण महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं
याप्रसंगी, सी.एम.आर.टी. च्या समन्वयक डॉ. हेमलता कोतकर, निसर्गसूत्र आणि बायोस्फीअर्स संस्थेचे संस्थापक डॉ. सचिन अनिल पुणेकर, निसर्गसूत्र अभियानाचे संस्थापक, बायोआंत्रप्रेन्योर श्री. शैलेश सराफ, ऍग्रोझी ऑर्गेनिक चे श्री. महेश लोंढे, कलाकार श्री. मंगेश निपाणीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती..
भरडधान्य-लक्ष्मी बीज चित्र हे स्थानिक देशी विविध प्रकारचे भरडधान्य वापरून ९०० स्के. क्षेत्रावर ही अनोखी कलाकृती साकारण्यात आली.
कदाचित भारतातील हे पहिले अशा प्रकारचे रेखाटलेले भरडधान्य बीज-चित्र असणार आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक-देशी, आपल्या मातीतल्या भरडधान्याचा वापर केला गेला.
या बीज-चित्राच्या माध्यमातून जनमानसात भरडधान्य आणि बीज संस्कृती रुजावी, स्थानिक-देशी परंपरागत धान्य, वाणाचे संवर्धन, जतन व्हावे या उद्देशाने या अनोख्या बीज-चित्राची निर्मिती करण्यात आली आहे. भरडधान्य किंवा मिलेट हा पौष्टिक धान्याचा महत्वाचा गट आहे, त्याचे औषधी आणि पर्यावरणीय गुणधर्म लक्षात घेता हा जैविक ठेवा किंवा वारसा अक्षय्य रहावा या उद्देशाने ही चित्रकृती साकारली गेली आहे.
भरडधान्याच्या माध्यमातून सदर बीज चित्रासाठी नाचणी, ज्वारी, बाजरी, भाडी-राळा, बर्टी, वरई यांचा वापर करण्यात आला. यापुढे ही भरड-धान्यलक्ष्मी बीज-चित्र संकल्पना इतर अनेक ठिकाणी राबवली जाणार आहे.या भरडधान्य-लक्ष्मी बीज चित्राची संकल्पना डॉ. सचिन अनिल पुणेकर यांची होती तर हे बीज-चित्र . मंगेश निपाणीकर यांनी रेखाटलं होतं
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App