सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनाच्या कारणामुळे मागील दोन वर्षापासून हेरिटेज वॉक स्थगित करण्यात आला होता.मात्र, आता त्यास पुन्हा सुरुवात करण्यात येत असल्याने विद्यापीठ मधील ऐतिहासिक भुयार पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हेरिटेज वॉक हा उपक्रम गेल्या काही काळात कोव्हिड निर्बंधांमुळे थांबला होता, मात्र ऐतिहासिक मुख्य इमारतीला नुकतीच १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनापासून (१० मार्च) हा हेरिटेज वॉक उपक्रम कोव्हिडचे निर्बंध पाळून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. Pune University again started heritage walk in campus after two years
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारत, इमारतीत असणारे भुयार, विद्यापीठातील संग्रहालये, येथील जैवविविधता, निसर्गरम्य परिसर हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून २०१८ साली विद्यापीठाने हेरिटेज वॉक हा उपक्रम सुरू केला आहे. या हेरिटेज वॉकला आजपर्यंत हजारो नागरिकांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देत विद्यापीठाच्या निर्मितीचा इतिहास जाणून घेतला आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनादिवशी त्यांच्या कार्याला अभिवादन करून विद्यापीठातील इतिहास विभाग, मानवशास्त्र विभाग आणि माध्यम समन्वय कक्ष या तीनही विभागांच्या वतीने कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या नेतृत्वाखाली काही काळ थांबलेल्या या हेरिटेज वॉकचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे माजी सदस्य सचिव राजेंद्र होलानी यांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉकची सुरुवात गुरवारी डी. व्ही. पोतदार संकुल येथून करण्यात आली. हा हेरिटेज वॉक सर्व नागरिकांसाठी खुला असणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App