प्रतिनिधी
पुणे : Pune Swargate स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे.Pune Swargate
आरोपी फरार झाल्यानंतर त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते आणि तो गावातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती. त्या दृष्टीने पोलिसांकडून श्वान पथक बोलावून तसेच ड्रोनच्या साहाय्याने आरोपीचा शोध घेतला जात होता. त्यानंतर अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर शिरूर येथून रात्री तीन- सव्वातीनच्या सुमारास पुण्यातील लष्कर पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आरोपीच्या शोधासाठी आता 8 पथके तैनात करण्यात आली असून तपास सुरू आहे. यादरम्यान पीडित तरुणीचा मेडिकल अहवाल समोर आला असून त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीवर एकवेळा नव्हे तर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडित तरुणीला म्हणाला ताई कुठे चाललीस? त्यावर मुलीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी म्हणाला, सातारची बस इथे लागत नाही, ती तिकडे लागलेली आहे. त्यावर तरुणी म्हणाली, नाही. बस इथेच लागते. म्हणूनच मी इथे बसली आहे. त्यावर आरोपी पुढे म्हणाला, बस तिकडे लागली आहे. चल मी तुला तिकडे घेऊन जातो. त्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर जाते. तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता.
हा अंधार पाहून तरुणीने आरोपीला विचारले की, बसमध्ये अंधार आहे. त्यावर आरोपी म्हणाला, ही रात्री उशिराची बस आहे. लोक झोपलेले आहेत. त्यामुळे लाईट बंद आहे. तू वरती चढून मोबाईलची टॉर्च लावून चेक करू शकते. त्यानंतर पीडित तरुणीने बसमध्ये चढून टॉर्च लावण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आरोपीने बसचा पाठीमागून दरवाजा बंद केला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App