Pune Rave Party : रेव्ह पार्टीत पोलिसांनीच अंमली पदार्थ प्लांट केले; प्रांजल खेवलकरांच्या वकिलांचा युक्तिवाद, राजकीय षड्यंत्रचा आरोप

Pune Rave Party

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pune Rave Party शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत सात जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टी दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत.Pune Rave Party

अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला, पाच पुरुषांचा समावेश असून, एकनाथ खडसेंच्या जावयाचा सहभाग आहे. या प्रकरणावर न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी सरकारी वकिलांसह प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. यात प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी थेट पोलिसांवरच आरोप केले की हे अमली पदार्थ त्यांनीच प्लांट केले असतील.Pune Rave Party



सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता तपास अधिकारी वेळेत न पोहोचल्याने न्यायाधीश चेंबरमध्ये निघून गेले. सुनावणी उशीरा सुरु करण्यात आली. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सातही आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रांजल मनिष खेवलकर(41), निखिल जेठानंद पोपटाणी (35), समीर फकीर महमंद सय्यद (41), सचिन सोनाजी भोंबे (42), श्रीपाद मोहन यादव (27), ईशा देवज्योत सिंग (22), प्राची गोपाल शर्मा (22) अशी आहेत. यात निखिल पोपटानी, समिर सय्यद आणि एका महिलेला नशा करण्याची सवय असल्याचे सरकारी वकिलांनी नमूद केले. तसेच या प्रकरणाची माहिती देत असताना सरकारी वकिलांनी ‘रेव्ह पार्टी’ असा शब्द प्रयोग केला. यावर न्यायाधीशांनी आक्षेप घेत हा शब्द वापरण्यास मनाई केली. अटक केलेल्या आरोपींनी अंमली पदार्थ कुठुन आणले याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली.

पोलिसांनीच अंमली पदार्थ प्लांट केले असावेत- प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांचा युक्तीवाद

एकनाथ खडसे यांचे जावई तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय षड्यंत्र असल्याचे वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितले. आरोपींनी कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन केले नव्हते. पोलिसांनीच अंमली पदार्थ प्लांट केले असावेत. आमच्याकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही किंवा ते जवळही बाळगले नसल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

प्रांजलला या अगोदर तीन वेळी अडकवण्याचा प्रयत्न

पुढे बोलताना वकील विजयसिंह ठोंबरे म्हणाले, प्रांजलला या अगोदर तीन वेळी अडकवण्याचा प्रयत्न झाला. यातील एक ही कलम लागू होत नाही. पोलिस गेले, पोलिसांनी व्हिडीओ शूटिंग केले. यावर कारवाई झाली पाहिजे. कशासाठी कोठडी द्यावी कारणे द्यावे. यातील काही जण गुन्हेगार आहे म्हणून कोठडी का द्यावी. सीसीटीव्ही फुटेज आहे आमच्याकडे. मला अडकवायचे होते त्यासाठी एवढे केले का? पोलिसांनी अगोदर पाहणी केली का? या ठिकाणी काही अमली पदार्थ आढळून आले, पण कुठे दुसरीकडे मिळून आला. गुन्हा जामीन होऊ शकतो. राजकीय द्वेषातून हे होत असेल तर चुकीचे आहे. धुळफेक करण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. यात काही रोल माझा नाही. माझ्यासमोर सुद्धा कोणी असे काही केले नाही. पोलिसांनी हे सगळे केले असावे असा माझा आरोप आहे.

भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी कशाला पोलिस कोठडी हवी?

या अगोदर दोन ठिकाणी पोलिस साध्या वेशात येऊन गेले होते. माझ्याकडे एक ही गोष्ट आढळून आली नाही. एन.डी.पी. एस बाबत खूप रोल आहेत. अंमली पदार्थ कोणाकडून आणले त्याचा तपास व्हावा. झालेल्या सगळ्या भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी कशाला पोलिस कोठडी हवी आहे? असा सवालही आरोपीच्या वकिलांनी केला. हॉटेल परिसरात पोलिस येऊन गेले आहेत. सगळे घेऊन आले आहे. अमली पदार्थ कोणी घेतले कोणी आणले त्याचा तपास करावा. हे रेकॉर्डचे गुन्हेगार नाही. बंदूक ठेवून शिकार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी काही केले नाही माझा संबंध नाही. त्यामुळे प्रांजल खेवलकर याला जामीन मिळावा, असेही पुढे विजयसिंह ठोंबरे यांनी म्हटले.

Pune Rave Party: Defense Alleges Police Planted Drugs, Political Conspiracy

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात