लोहगाव धानोरी येथील सर्व्हे नंबर 261/1 येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभगाने छापा टाकून कारवाई केली.
विशेष प्रतिनिधी
पुणे –लोहगाव धानोरी येथील सर्व्हे नंबर 261/1 येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभगाने छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी जुगार घेणार्या तीन जणांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार अड्ड्याबाबत स्थानिक पोलिसांना या बेकायदेशिर सुरू असलेल्या जुगार अड्ड्याबाबत माहिती कशी मिळाली नाही. गुन्हे शाखेने छापा मारून कारवाई लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.pune police Social security Department raided at Dhanori gambaling
शंकर नरसिंग शावणे (42, रा. लोहगाव), बबन बन्सी सरोदे (51, रा. विश्रांतवाडी, पुणे), धनंजय बापुराव गुट्टे (35, रा. धानोरी पुणे) हे तिघे कल्याण मटका जुगार चिठ्ठ्यावर जुगार घेत होते. तर यावेळी सुरज माणिकराव मुळे (36, लोहगाव), अमित सुखदेव शेलार (25, दोघेही रा. विश्रांतवाडी), सनी राम तामचेकर (27, रा. येरवडा), संदिप अरूण भागवत (42, रा. धानोरी)
आणि बबलू बाळू राठोड (27, रा. येरवडा) हे पाच जण जुगार खेळताना आढळून आल्याने त्यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून यावेळी चार हजाराचे जुगाराचे साहित्य व रक्कम जप्त करण्यात आली आहे.
बुधवारी (दि.30) रोजी धानोरी येथील जकात नाक्याजवळ बेकायदेशिररित्या जुगार खेळत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, अश्विनी केकाण, हणमंत कांबळे यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App