विशेष प्रतिनिधी
मुंबई : कालीचरण महाराज हे नाव सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. कालीचरण महाराज यांनी रायपूरच्या धर्मसंसदेत महात्मा गांधींविरोधात अपशब्द वापरले होते. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचेही त्यांनी कौतुक केले. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.त्यातच आता पुणे पोलिसांकडून कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या दुसऱ्या एका प्रकऱणात कालीचरणवर गुन्हा दाखल केला आहे.कालीचरण आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. मिलिंद एकबोटेवर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाबरोबरच इतरही अनेक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालीचरण यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य त्यांना भोवलं असून, याआधी २ ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत.दरम्यान १९ डिसेंबरला नातूबागेतील अफझलखानाचा आनंदोत्सव साजरा कऱण्यासाठी कालीचरण आला होता.दरम्यान या प्रकरणात कलम २९७, २९८ आणि ३४ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या एकुण प्रकरणात मिलींद एकबोटे, मोहन शेटे, नंदकुमार एकबोटे यांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App