विशेष प्रतिनिधाी
मुंबई : Pune Pimpri आगामी महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागताच राजकीय आखाड्यात मोठे भूकंप होण्यास सुरुवात झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलणारी मोठी घडामोड आज मुंबईत पार पडली. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरीतील दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, वडगाव शेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठे यश मिळाले असून, अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.Pune Pimpri
विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडून शरद पवार गटाची ‘तुतारी’ हाती घेतली आणि विजय मिळवला. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती, असे बोलले जाते. आता फडणवीसांच्याच सूचनेनुसार सुरेंद्र पठारे घरवापसी करत असल्याने पठारे कुटुंबाने एकाच वेळी दोन्ही प्रमुख पक्षांशी ‘नाळ’ जुळवून ठेवल्याची चर्चा रंगली आहे. सुरेंद्र यांच्यासोबतच पुण्यातील माजी नगरसेवक विकास दांगट, सायली वांजळे आणि बाळा धनकवडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुण्यात भाजपची ताकद वाढली आहे.Pune Pimpri
पिंपरीत अजितदादांना धक्का
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. आजच्या प्रवेश सोहळ्यात अजित पवार गटाचे तब्बल 8 आणि इतर पक्षांचे 7 अशा 15 बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ आणि माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम यांचा समावेश आहे. ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही भाजपची वाट धरल्याने महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे.
पिंपरी भाजपमध्ये ‘निष्ठावंतांचा’ उद्रेक
एकीकडे मुंबईत इनकमिंगचा सोहळा सुरू असताना, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या निष्ठावंत इच्छुकांनी बंडाचा इशारा दिला आहे. “आम्ही 820 जणांनी मुलाखती दिल्या, पक्षासाठी वर्षे खर्ची घातली, मग आता उपऱ्यांचे लाड कशासाठी?” असा सवाल निष्ठावंतांनी उपस्थित केला आहे. “बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यास आम्ही शांत बसणार नाही, थेट बंड करू,” असा इशारा स्थानिक इच्छुकांनी दिला आहे. त्यामुळे हे ‘मेगा इनकमिंग’ भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App