मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची शहराचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली अनेक वर्षांपासुनची मागणी लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन मार्च २०२३ मध्ये अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुणेकरांच्या या मागणीकडे लक्ष वेधलं होतं.. Pune Municipal Corporation Declared The Some Discount Of The Property Tax..
बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली..
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून १० टक्के ऐवजी १५ टक्के सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षीक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करतांना ४० टक्के सवलत देण्यास शासनान मान्यता दिली. आहे..
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App