सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली. Pune: Mundhwa police take action against 4 big hotels violating corona rules
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे.
दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाणार आहेत.दरम्यान पुण्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार मोठ्या हॉटेलवर मुंढवा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.हॉटेल मालकाला वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. हॉटेल मालकांची बैठक घेऊनही कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात येत होतं.
पुण्यातील मुंढवा परिसरात सुरू असलेल्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्ट्यांमध्ये जाऊन पोलिसांनी कारवाई केली.पोलिसांनी हॉटेलमध्ये स्वतः जाऊन साऊंड सिस्टिम बंद केली. कोरोना नियमांचं उल्लंघन सर्रास होत असल्याचं दिसून आलं आहे. मुंढवा पोलिसांच्या कारवाईने खळबळ उडाल्याचा दिसून आलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App