आता १५ डिसेंबरपासून सुरू होणार पुणे मुंबईच्या शाळा ; वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

कोरोना व्हायरसचा नवा ओमिक्रोनचा व्हेरिएंट आल्यामुळे मुंबई , पुणे येथील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.Pune-Mumbai schools to start from December 15; Information provided by Varsha Gaikwad


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच सावट कमी झाल्याने राज्यात हळू हळू निर्बंध शिथिल करण्यात आले होते. दरम्यान शाळा ही सुरू करण्यात आल्या होत्या. दिवाळीच्या सुट्टी नंतर १ डिसेंबरला शाळा पुन्हा सुरू होणार होत्या.

परंतु याच दरम्यान आता ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे १ डिसेंबर ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.ही माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.कोरोना व्हायरसचा नवा ओमिक्रोनचा व्हेरिएंट आल्यामुळे मुंबई , पुणे येथील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.



पुढे वर्षा गायकवाड म्हणाल्या की , स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन, शाळांविषयी निर्णय घेतला जाईल.दरम्यान मुंबई पुण्यातील शाळा १५ डिसेंबर पासून सुरू करण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टास्क फोर्सशी चर्चा करून त्याच सोबत कोरोना व ओमायक्रॉनच्या संसर्गाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.अस वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Pune-Mumbai schools to start from December 15; Information provided by Varsha Gaikwad

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात