विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यात तुम्ही घर घेण्याचं स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून (Pune Mhada) ही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Pune Mhada Lottery 2021: Good news for Pune residents! Lottery of more than 3000 houses on the occasion of Diwali
दिवाळीच्या मुहूर्तावर 3000 हून जास्त घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. कोरोनामुळे (Covid 19) सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे.Pune Mhada Lottery 2021 apply here
पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून एका वर्षांत घरांच्या लॉटरीची हॅटट्रिक करण्यात आली आहे. ऐन कोरोना काळात जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्यावतीने तब्बल 5657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या लॉटरीला मोठी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर म्हाडाने प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2500 घरांची सोडत म्हाडाने काढली होती. त्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा आणखी 3000 हून जास्त घरांसाठी लॉटरी काढत आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. त्यात राज्य सरकारनं केलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करत सर्व मोठ्या बिल्डरांकडून 20 टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देणे हा उद्देश ठेवला आहे. त्यामुळे आता ही घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये 1500 घरे 20 टक्क्यातील आणि सर्व नामांकित तसेच मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App