सुप्रियाताई, भाजपची ED चौकशी जरूर करा, पण अनिल देशमुखांच्याही ED चौकशीवर विश्वास ठेवा…!!; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा तडाखा

विशेष प्रतिनिधी

पुणे : बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात येऊन पुण्याला दिलेल्या २०० कोटी रूपयांचे काय झाले, याची ED चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावरून पुण्याचे महापौर आणि भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करून सुप्रिया सुळे यांनाच राजकीय तडाखे दिले आहेत. pune mayor murlidhar mohaol targets MP supriya sule over pune west management issue

मुरलीधर मोहोळ यांनी केलेली ट्विट अशी 

  • सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत! पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करण्याची मागणी केली आहे.
  • सुप्रियाताईंनी ED मार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचं स्वागत करतो. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ED चौकशी बाबतीतही सुप्रियाताईंनी हाच विश्वास कायम ठेवावा.
  • सुप्रियाताई यांची खासदारकीची यंदा तिसरी टर्म आहे. २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू मा. अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का ?

  • उलट गेल्या ४ वर्षात आम्ही कचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय पातळीवर सातत्याने घेतली जात आहे. अगदी कालच पुण्याच्या Waste Managment ची दखल केंद्राने घेतली. कचरा प्रक्रिया करण्यासाठी ६ नवे प्रकल्प हे आमच्याच काळात म्हणजे गेल्या चार-साडेचार वर्षांत सुरू झाले.
  • भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महानगरपालिका आल्यानंतर पुणे शहराच्या कचरा प्रक्रियेची क्षमता १२०० मेट्रिक टनावरून १८०० मेट्रिक टनापर्यंत वाढवली गेली. याचीही माहिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात ‘एक्टिव्ह’ होत असलेल्या सुप्रियाताईंनी घ्यावी.
  • आपल्या पक्षाने तर अनेक सुरू होणारे प्रकल्प तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले. मात्र केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे ताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • मुरलीधर मोहोळ यांनी केलेली ट्विट एवढी स्वयंस्पष्ट आहेत. की त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. पण सुप्रिया सुळेंसमोर अंबिल ओढा परिसरातील नागरिकांनी अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या हे देखील विसरून चालणार नाही.

pune mayor murlidhar mohaol targets MP supriya sule over pune west management issue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात