विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशभरात पोटनिवडणुका झाल्या. ईशान्य भारतातल्या विधानसभा निवडणुका झाल्या, पण त्यावरचे रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी “किरकोळ” केले आणि कसब्याची निवडणूक ही केवळ 5 – 10 मार्कांचा प्रश्न असताना माध्यमांनी त्यावर PhD चा प्रबंध लिहावा, असे रिपोर्टिंग केले. Pune marathi media made very much exaggerated reporting of Kasba Byelection
कसब्यात भाजपचा पराभव झाला म्हणजे जणू काही भाजपवर आकाश कोसळले आणि भाजपच्या सत्तेला कायमची घरघर लागली एवढा आनंद मराठी माध्यमांना झाला. “रवींद्र धंगेकर घासून नाही, ठासून आले”, “ते विजयाचा गुलाल अंगावर घेऊन टिळकांच्या घरी गेले”, वगैरे बातम्या एवढ्या रंगवल्या की जणू काही हा विजय रवींद्र धंगेकरांचा नसून पुण्याच्या मराठी माध्यमांचाच आहे, असे आभासी माध्यमांमध्ये “प्रभासमान” झाले!!
कसब्यात ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला एवढी भोवली की ब्राह्मण समाज त्यापासून कायमचा दूर गेला, असे निष्कर्ष यातून काढण्यात आले. जणू काही ब्राह्मण समाज हा कसब्यात कायमच निर्णयाक राहिला आहे आणि ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिली नाही तर संबंधित पक्षांना नेहमीच शिक्षा मिळते, असा दावा मराठी माध्यमांनी केला. पण यातले वास्तव मात्र माध्यमांनी त्यांच्या नेहमीच्या “पवार बुद्धी” चतुराईने दडवले.
पुण्यातले ब्राह्मण नेतृत्व, ते देखील भाजप मधले नाही तर काँग्रेस मधले, हे कोणी संपवले?? बरं त्यातही त्या ब्राह्मण नेतृत्वाने आपल्या बहराच्या काळात जे राजकीय कर्तृत्व दाखवले, ते त्यांच्या अखेरच्या काळात त्यांना संपवणाऱ्या नेत्यांना तरी दाखवत आले का?? म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचे झाले, तर बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक, सुरेश कलमाडी या काँग्रेसच्या ब्राह्मण नेतृत्वाला शरद पवार तरी या नेत्यांच्या बहराच्या काळात संपवू शकले का??, तर याचे उत्तर नकारार्थी आहे. उलट बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक, सुरेश कलमाडी यांचे पुण्याच्या काँग्रेसवर पर्यायाने पुण्यावर एवढे वर्चस्व होते, की पवारांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीतली 40 वर्षे त्यांना या तीनही नेत्यांशी पुण्याच्या राजकारणात जुळवूनच घ्यावे लागले होते. या 40 वर्षांमध्ये पुण्याच्या राजकारणात पवार ड्रायव्हिंग सीटवर नव्हते, तर सुरुवातीला बॅरिस्टर गाडगीळ, जयंतराव टिळक आणि नंतर सुरेश कलमाडी हे ड्रायव्हिंग सीटवर होते!!
2000 नंतर जेव्हा बॅरिस्टर गाडगीळ, जयंतराव टिळक हे निधन पावले होते आणि सुरेश कलमाडींचे राजकीय अस्तित्व संपले होते किंवा संपत चालले होते, तेव्हाच “पवार फॅक्टर” पुण्याच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने उगवला आणि काही प्रमाणात एस्टॅब्लिश झाला. यापलिकडे ब्राह्मण नेतृत्वाला, त्यातही काँग्रेसच्या ब्राह्मण नेतृत्वाला पवारही संपवू शकले नव्हते!!, ही वस्तुस्थिती आहे आणि पुण्याच्या मराठी माध्यमांनी ती लपवली आहे.
अशा स्थितीत भाजपचे ब्राह्मण नेतृत्व कोणी संपवणे आणि ते संपवल्यामुळे भाजपचा भाजपवर ब्राह्मण समाजाचा रोष निर्माण होणे ही तर लोणकढी राजकीय थाप होती आणि ती माध्यमांनी व्यवस्थित मारून घेतली!!
पण हे करतानाही माध्यमांनी मूळातच कसब्याचा प्रश्न हा 5 – 10 मार्कांचाच होता, तो सोडवताना PhD चा प्रबंध लिहिला. कारण कसब्यात भाजप पराभूत झाला होता आणि भाजपचा पराभव काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना जेवढा आनंददायी ठरणार होता, त्यापेक्षा कितीतरी पटीचे पटीचा आनंद पुण्यातल्या मराठी माध्यमांना होणार होता. तो आनंद भाजपच्या पराभवाने मिळवून दिला आणि म्हणूनच कसब्याचा 5-10 मार्कांचा प्रश्न मराठी माध्यमांनी PhD चा प्रबंध लिहून सोडवला आणि बाकीच्या पोटनिवडणुकांच्या रिपोर्टिंग कडे ऑप्शनला टाकायचा प्रश्न म्हणून पाहिले किंवा ते प्रश्न 1 – 2 मार्कांचे करून सोडवले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App