मशीदीवरील भाेंगे काढण्याचे प्रकरणावरुन तसेच अजानच्या भाेंग्यासमाेर माेठया आवाजात हनुमान चालिसा लावा अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली हाेती. परंतु महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत माेरे यांनी त्यास विराेध दर्शवल्यानंतर त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -मशीदीवरील भाेंगे काढण्याचे प्रकरणावरुन तसेच अजानच्या भाेंग्यासमाेर माेठया आवाजात हनुमान चालिसा लावा अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली हाेती. परंतु महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत माेरे यांनी त्यास विराेध दर्शवत आपण अशाप्रकारे कृत्य करणार नसल्याचे सांगितले. Pune Maharashtra Navanirman Sena president vasant more dismissed by MNS chief Raj thakare,they appointed Sainath babar new president
दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेत पुणे शहराध्यक्ष पदावरुन वसंत माेरे यांची हकालपट्टी करत त्याजागी नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
नगरसेवक वसंत माेरे हे मनसेचे पुण्यातील एक प्रमुख नेते असून राज ठाकरे यांचे जवळचे कार्यकर्ते मानले जातात. पुण्यात मनसेचे वसंत माेरे व साईनाथ बाबर हे दाेनच नगरसेवक असून नुकतेच मनसेच्या प्रमुख नेत्या रुपाली ठाेंबरे पाटील यांनी पक्षातील अंर्तगत पक्षाचा राजीनामा दिल्याने पक्षाला धक्का बसला हाेता. त्यातच आता वसंत माेरे यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याने पक्षाला हा माेठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. माेरे आता नेमका काेणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App