प्रतिनिधी
पुणे : महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी मोठमोठ्या सभांपूर्वी वज्रमूठ कितीही घट्ट केली तरी प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये वज्रमूठ ढिल्ली पडू शकते याचा प्रत्यय आज पुण्यात आला. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी “आतल्या गोटातील” बातमी आहे, असे सांगून पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, असे सांगताच वज्रमूठ लगेच ढिल्ली पडली आहे. Pune loksabha byelections : ajit Pawar – Mohan joshi makes contradictory claims
कारण एकीकडे अजितदादांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा ठोकताच काँग्रेसचे पुण्यातले वरिष्ठ नेते मोहन जोशी पुढे आले आणि त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघ मूळचा काँग्रेसचा आहे. त्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवणार, असे सांगून अजितदादांच्या वक्तव्याला छेद दिला आहे.
अजित पवार धादांत खोटे बोलताहेत; विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून नानांचा हल्लाबोल
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार असे अपेक्षित होते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये तशा अधिकृत पातळीवर कोणत्याही हालचाली दिसल्या नाहीत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या चर्चा थंडावल्या होत्या. पण आज अजितदादांनी पुण्याच्या टिंबर मार्केटला भेट देण्याच्या निमित्ताने या पोटनिवडणुकीबाबत “आतल्या गोटातील” बातमी असे म्हणून ती कधीही जाहीर होऊ शकते, असे सांगितले आणि अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचा दावा ठोकला. ज्या पक्षाची जिथे ताकद जास्त आहे, त्याला तिकीट मिळावे. पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असे अजितदादा म्हणाले.
पण पुण्याची जागा काँग्रेसचीच आहे. काँग्रेसचा उमेदवार तिथून पोटनिवडणूक लढवेल, असे सांगून मोहन जोशींनी अजितदादांच्या वक्तव्याला छेद दिला आणि मोठमोठ्या जाहीर सभांमधली एकजुटीची वज्रमूठ प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात कशी ढिल्ली पडते, याचा प्रत्यय आणून दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App