विशेष प्रतिनिधी
पुणे : Jain Munis पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले असून, यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मोहोळ यांनी नुकतीच जैनमुनींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी, ‘माझा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही आणि मी हे पुराव्यानिशी वारंवार स्पष्ट केले आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, हा प्रश्न काही दिवसांत संपेल,’ असे आश्वासन दिले होते. मात्र, मोहोळ यांच्या या विधानानंतर आता जैनमुनींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.Jain Munis
जैनमुनींनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, मंत्री आणि खासदार मोहोळ यांनी या ठिकाणी भेट देत मी तुमची समस्या सोडवेन असे म्हटले आहे, मात्र समाजाला त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे उद्या (दिनांक 27) संपूर्ण देशात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही गावाखेड्यात मोर्चा काढू आणि अधिकाऱ्यांनी निवेदन देऊ, असा निर्णय जैन मुनींनी घेतला आहे.Jain Munis
या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील आक्रमक भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. त्यांच्याविषयी बोलताना जैन मुनी म्हणाले, राष्ट्रीय माध्यमात मांजर नाचले तरी व्हिडियो येतो, मात्र महावीर स्वामींचे मंदिर विकले गेले तरी राष्ट्रीय माध्यमे गप्प आहेत. राज्यातील चॅनल चांगले काम करत आहेत. धंगेकर आंदोलनासाठी उत्साहित आहेत. त्यांचा आपला जोश चांगला आहे. एक तारीखेच्या आधी डील रद्द झाली नाही तर एकत्र आंदोलन करू. त्यांनी वेगळे आंदोलन करू नये.
हवाई उड्डाण विभागाचे 197 कोटींचे नुकसान- रवींद्र धंगेकर
रवींद्र धंगेकर यांनी ‘केंद्रीय मंत्रीपदाचा गैरवापर’ केल्याचा अत्यंत गंभीर आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर केला आहे. धंगेकर यांनी बॉम्बे फ्लायिंग क्लबच्या थकबाकी प्रकरणात मोहोळ यांनी हस्तक्षेप करून हवाई उड्डाण विभागाचे तब्बल 197 कोटी रुपयांचे मोठे नुकसान केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. विशेष म्हणजे, ज्या क्लबला फायदा करून दिला, त्याच क्लबने मोहोळ यांचे व्यावसायिक भागीदार मानले जाणाऱ्या विशाल गोखले यांना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचा आरोप करत, धंगेकर यांनी ‘विशाल गोखले यांच्यामार्फत कोणत्या कामाची दलाली झाली?’ असा थेट सवाल विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App