पुणे : लागा तयारीला …पोलिस भरतीची तारीख जाहीर!केंद्र सरकारची भरती प्रक्रिया करण्यास परवानगी …असा करा अर्ज

विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष भरती प्रक्रिया रखडली होती. अशातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना केंद्र सरकारने राज्यांना भरती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. Pune: Get ready … Date of Police Recruitment Announced! Permission of Central Government for recruitment process … Apply

शहरातील पोलीस दलातील 214 जागांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची लेखी परीक्षा येत्या 5 ऑक्टोबरला शहरातील विविध केंद्रावर होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.



मागील काही वर्षात झालेल्या भरती प्रक्रियेत बराच घोळ झाल्याचा दिसून आलं होतं. त्यामुळे यंदा पोलीस पदाच्या परीक्षा स्वतंत्र खासगी संस्थेकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील पोलीस दलातील 214 रिक्त जागांसाठी तब्बल 39 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

पुणे शहरातील पोलीस पदाच्या लेखी परिक्षेसाठी प्रवेशपत्र उमेदवारांना ई-मेलद्वारे पाठवण्याची प्रक्रिया येत्या बुधवारपासून सूरू होणार आहेत, लेखी परिक्षासाठी उमेदवारांनी ओळखपत्र काळजीपूर्वक केंद्रावर घेऊन यावं, त्याशिवाय परीक्षेला बसू दिलं जाणार नाही, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.

लेखी परिक्षासाठी उमेदवारांना प्रवेश पत्र http://mahapolicerecmahaitexam या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील 143 केंद्रावर या पदासाठी परिक्षा होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी विहित ओळखपत्रासह केंद्रावर उपस्थित राहावे. उमेदवारांना काही अडचणी असल्याच शहर नियंत्रण कक्षाशी त्याचबरोबर 9699792230 / 8999783728 किंवा 9309868270 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलीस गु्प्ता यांनी केलं आहे.

Pune: Get ready … Date of Police Recruitment Announced! Permission of Central Government for recruitment process … Apply

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात