पुणे – अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड कॉरिडॉर होणार!

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे जाळे निर्माण होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला.Pune Ahmednagar Chhatrapati Sambhajinagar Greenfield Corridor

पुणे शहर हे 212.50 कि.मी. लांबीच्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाने छत्रपती संभाजीनगर शहराशी जोडलेले आहे. या रस्त्यावर अंदाजे 90,000 पी सी यू एवढी रहदारी आहे. त्यामुळे या प्रवासाला अंदाजित 4 ते 5 तास लागतात. या रस्त्याला जोडून मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्यामूळे हा रस्ता वाहतुकीस अपुरा पडतो.



छत्रपती संभाजीनगर येथून अहमदनगर मार्गे पुण्याला जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते याचा विचार करता हा महामार्ग बनविण्यात येणार आहे. या रस्त्याची लांबी 268 कि. मी. असून हा रस्ता सहापदरी असेल. यासाठी 3752 हेक्टर भूसंपादन करण्यात आले असून याचा अंदाजित खर्च 4437 कोटी असेल. तसेच या महामार्गाच्या बांधकामाचा अंदाजित खर्च 7132 कोटी असेल. संपुर्ण रस्ता ग्रीन कॉरीडॉर असेल यासाठी रस्त्यावर वृक्षारोपण, सोलार विद्युत निर्मिती, इलेक्ट्रिक वेहिकल्स चार्जीग स्टेशन्स इत्यादींची उभारणी करण्यात येणार आहे.

हा रस्ता पुणे रिंग रोड येथे जोडला जाणार आहे, पुणे रिंग रोड सुद्धा लवकरच पूर्ण होईल. नागपूर येथून पुण्याला 6 तासात पोहोचता येईल असा हा महामार्ग बनविला जाणार आहे. नागपूर-गोवा महामार्गाचे काम ही यावर्षी चालू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी भारताला नेट झिरोवर घेऊन जात आहेत, या संकल्पनेवर हा रस्ता तयार केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे जाळे निर्माण होणार आहे.

Pune Ahmednagar Chhatrapati Sambhajinagar Greenfield Corridor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात