आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.Pune: 30 kg 180 gm cannabis seized in Pimpri-Chinchwad; Both arrested
विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज पिंपरी चिंचवडच्या भुजबळ चौकात तब्बल 7 लाखाहून अधिक किंमतीचा ३० किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.दरम्यान या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.महादेव वाघमारे (वय-31 रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड), रवींद्र प्रकाश घाडगे (वय-23 रा.वाकड, मुळ रा. शिरपूर, जि. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ चौकात महादेव वाघमारे आणि रवींद्र प्रकाश घाडगे हे दोघेजण प्रवासी बॅगमध्ये गांजा घेऊन आले होते.दरम्यान याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
ही माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून भुजबळ चौकात जुना जाकात नाका येथून या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडून पोलिसांनी ७ लाख ५४ हजार ५७५ रुपये किंमतीचा ३० किलो १८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App