कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचे उद्घाटन
विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnvis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र सायबरच्या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रित उपक्रमां’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉट आणि सायबर जागरुकता माहितीपटाचे उद्घाटन करत उपस्थितांना संबोधित केले.CM Fadnvis
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर फसवणुकीसंबंधीचे कॉल्स मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे अशा कॉल्सना उत्तरे देणे व नागरिकांना माहिती मिळण्यासाठी चॅटबॉट व माहितीपट महत्त्वाचे ठरणार आहेत. सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. अशा कामात अभिनेते शरद केळकर व अभिनेत्री अमिषा पटेल यांनी सहभाग घेतल्यामुळे नागरिकांपर्यंत चांगला संदेश जाईल.
नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेऊन विक्री करण्यासारख्या घटना रोखण्यासाठीही यापुढील काळात जनजागृती करावी. मानवी तस्करीमध्ये लोकांना वाईट पद्धतीने वागविले जाते. त्यामुळे यासारखे अमानुष प्रकार बंद करण्यासाठी जनजागृती उपक्रम महाराष्ट्र सायबरने हाती घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष सायबर सुरक्षा विषयक माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. मराठी आणि हिंदी भाषेत असलेल्या या माहितीपटात अभिनेते शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल यांनी काम केले आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी, सायबर फसवणूक संबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेते शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App