वृत्तसंस्था
पुणे : भारतात कोरोनाविरोधी लसीचे उत्पादन वेगाने व्हावे, यासाठी अमेरिकेने लसीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची निर्यात तातडीने करावी, अशा आशयाची मागणी सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आदर पुनावाला यांनी केली आहे.Provide raw material for Covishield vaccine immediately,Respect for Serum Punawala’s demand to US; Sakade to President Biden via Twitter
आदर पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्या कार्यालयीन वापरासाठी असलेल्या पोस्ट ट्विटरवर ट्विट करून ही मागणी केली आहे. कोरोनाविरोधात एकजुटीने लढा देण्याचा तुमचा खरा मानस असेल तर मी तुम्हाला लस निर्मात्या कंपन्यांच्या वतीने लासीसाठी लागणारा कच्चा माल कृपया पुरवावा, अशी विनंती करत आहे, असे पुनावाला यांनी म्हंटले आहे.
भारतात सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाविरोधी कोव्हिशिल्ड लस तयार केली आहे. आतापर्यत देशात कोट्यवधी लोकांनी लसीचे डोस घेतले आहेत. अनेक देशात लसीच्या डोसची निर्यात भारताने केली. या लस निर्मितीसाठी लागणार कच्चा माल हा प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमधून येतो.
परंतु तेथील सरकारनी या कच्चा मालाची निर्यात रोखून धरली आहे. त्यामुळे भारतात लसनिर्मितीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली असून निर्मितीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. आता तर देशात अनेक ठिकाणी लसीची टंचाई जाणवू लागली आहे.
Respected @POTUS, if we are to truly unite in beating this virus, on behalf of the vaccine industry outside the U.S., I humbly request you to lift the embargo of raw material exports out of the U.S. so that vaccine production can ramp up. Your administration has the details. 🙏🙏 — Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 16, 2021
Respected @POTUS, if we are to truly unite in beating this virus, on behalf of the vaccine industry outside the U.S., I humbly request you to lift the embargo of raw material exports out of the U.S. so that vaccine production can ramp up. Your administration has the details. 🙏🙏
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 16, 2021
या पार्श्वभूमीवर आदर पुनावाला यांनी लसीचा कच्चा माल तातडीने निर्यात करावा, असे साकडे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना पोस्ट ट्विटरद्वारे घातले आहे. याबाबतची विस्तृत माहिती अमेरिकी प्रशासनाला काळविल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App