विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यभरातून पुण्यात येऊन MPSC चा अभ्यास करण्यासाठी आलेल्या निवडक विद्यार्थ्यांनी काल शुक्रवारी सायंकाळी “अचानक” आंदोलन केले. त्यानंतर या आंदोलक विद्यार्थ्यांनी आज शनिवारी सकाळी “१ मोदी बाग” येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे या “अचानक” आंदोलनाच्या प्रकारामागे नेमकी कोणाची फूस होती??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल रात्री पुण्यात होते. ते आज सकाळी तिथून रायगडावर पोहोचले. या पार्श्वभूमीवर एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमके कालच आंदोलन करायचे कसे सुचले??, त्यामागे कुणी शक्ती पुरवली?? त्यातून कुणाला कोणता हेतू साध्य करून घ्यायचा होता??, असे सवाल समोर आले.
त्यानंतर आज सकाळी आंदोलन विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या कानावर आपल्या समस्या घातल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर शरद पवारांनी MPSC आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेठ यांनी शरद पवारांना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
काही महिन्यांपूर्वीच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी असेच आंदोलन केले होते त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार तिथे आवर्जून पोहोचले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी काल “अच आंदोलन केले आणि आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे या आंदोलनाच्या एकूणच हेतूविषयी राजकीय वर्तुळातून मोठी शंका व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App