पुण्यातील हडपसर भागात घरफोडी करणाऱ्या तीन गुन्हेगारांना जेरबंद करत पोलिसांनी 13तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Property worth Rs 6.5 lakh seized from burglars
विशेष प्रतिनिधी
पुणे – हडपसर परिसरातील विविध भागात घरफाेडी गुन्हे करणाऱ्या दाेन तरुणांना अटक करण्यात हडपसर पाेलीसांच्या तपास पथकास यश आले आहे. याप्रकरणी अमिर ऊर्फ लकी सलिम पठाण (वय-२४,रा.हडपसर,पुणे, मु.रा.अकलूज, साेलापूर) व आदित्य बबन शिंदे (२३,रा.डपसर,पुणे) या दाेन आराेपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून सात घरफाेडी गुन्हयातील १३ ताेळे साेने व साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अरविंद गाेकुळे यांनी दिली आहे. Police arrest house theft criminals in Hadapsar
हडपसर पाेलीस ठाण्याचे हद्दीत मागील काही दिवसात घरफाेडी गुन्हयात वाढ झाली आहे. याअनुषंगाने सहा.पाे.नि. विजयकुमार शिंदे, पीएसआय अविनाश शिंदे व तपासपथक अंमलदार यांची टिम तयार करुन दिवसा घरफाेडी झालेल्या ठिकाणांची माहिती संकलीत करण्यात आली. त्याआधारे तपासाची दिशा ठरवून तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता, तपास पथकाचे पाेलीस अंमलदार शाहीद शेख, समीर पांडुळे, शशिकांत नाळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, आराेपी अमिर पठाण याला पाेलीसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चाैकशी केली असता, त्याने मागील दाेन महिन्याचे कालावधीत त्याचा साथीदार संदीप गायकवाड (रा.कात्रज,पुणे) याचेसह दिवसा घरफाेडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी एकूण सहा घरफाेडीचे गुन्हे केले असून त्यांच्या ताब्यातून१०३.६१८ ग्रॅम वजानाचे साेन्याचे दागिने हस्तगत केले आहे. न्यायालयात त्यांना हजर केले असता पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनाविण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App