नाशिक : महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मधले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेच्या आमदारकीत ज्यांना खोडा घातला, त्यांना भाजपने थेट विधान परिषद सभापतीपदाचा सन्मान दिला. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू साथीदार प्रा. राम शिंदे यांच्या बाबतीत हा अनोखा योगायोग घडला!!Prof. Ram Shinde to be the new chairman of maharashtra state council
2024 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदार संघातून रोहित पवारच निवडून यावेत यासाठी अजित पवारांनी त्या मतदारसंघात जाऊन प्रा. राम शिंदे यांच्यासाठी सभा घेतली नाही. राम शिंदे यांचा फक्त 1243 मतांनी पराभव झाला. रोहित पवार तिथे थोडक्यात बचावले. अजित पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी बेटया थोडक्यात वाचलास मी तिथे सभा घेतली असती तर काय झालं असतं??, असा सवाल करून पवार घराण्यातल्या राजकारणाचा विश्वासघातकी बाज सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड केला. अजितदादा मुद्दामून कर्जत जामखेडला सभा घ्यायला गेले नव्हते.
अर्थात अजितदादांनी प्रा. राम शिंदे यांची विधानसभेतली वाटचाल रोखली, म्हणून राम शिंदे यांचे राजकीय भवितव्य ते धुसर करू शकले नाहीत. उलट भाजपने राम शिंदे यांना आता थेट विधान परिषदेच्या सभापतीपदाची संधी दिली आहे. प्रोटोकॉल नुसार राज्यपालांनंतरचा तो सन्मान आहे. राम शिंदे विधान परिषदेच्या सभापती पदासाठी उद्या अर्ज दाखल करणार आहेत. प्रा. शिंदे यांच्या रूपाने ना. स. फरांदे यांच्यानंतर भाजपच्या दुसऱ्या ओबीसी नेत्याला विधान परिषदेच्या सभापती पदाचा सन्मान मिळणार आहे.
राम शिंदे यांचा जन्म अहिल्यादेवींच्या चोंडी या गावात झाला. या चोंडी गावाचा उल्लेख शरद पवारांनी रोहित पवारांच्या मतदारसंघातले गाव असा केला होता. एरवी बहुजन राजकारणाचा ढोल पिटणाऱ्या पवार कुटुंबाने गरीब कुटुंबातून आलेल्या ओबीसी समाजातल्या राम शिंदे यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आणले होते. परंतु, भाजपने मात्र आपल्या कार्यकर्त्यांची बूज राखत विधान परिषदेच्या सभापती सारख्या सर्वोच्च पदावर संधी देत राम शिंदे यांचा सन्मान केला. एका सालगड्याचा मुलगा आधी विधान परिषदेचा आमदार झाला आणि आता तोच विधान परिषदेच्या सभापती पदावर विराजमान होणार आहे.
2014 मध्ये प्रा. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात सुरुवातीला त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचे राज्यमंत्री होते. त्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग खाते, पणन खाते त्यांनी सांभाळले होते. मराठा राजकारणाचा मोठा अड्डा असणाऱ्या नगर जिल्ह्यामध्ये भाजपने प्रा. राम शिंदे यांचे मोठे ओबीसी नाव म्हणून नेतृत्व विकसित केले. स्वतः राम शिंदे यांनी गुणवत्ता दाखवून भाजपच्या अपेक्षेला न्याय दिला. त्यामुळेच आज विधान परिषदेच्या सभापती पदाचा सन्मान त्यांना मिळाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App