प्रतिनिधी
मुंबई : महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी रामचंद्र नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या निधनाने समता चळवळीचा आघाडीचा शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. prof hari narke passed away
महाराष्ट्रातील डाव्या चळवळीशी नरके यांचा नजिकचा संबंध राहिला. महात्मा फुले वाङ्मयाचा अभ्यास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी 56 पुस्तकांचं लेखन आणि संपादन केले आहे.
मराठीतील एक प्रसिद्ध लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि त्याचबरोबर मराठी ब्लॉगर अशी हरी नरके यांची ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक राहिले. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. ओबीसी आरक्षण हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता.
– भिडे वाडा स्मारकासाठी अखेरपर्यंत प्रयत्न
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचं कार्य सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोवण्यात हरी नरके यांचा मोठा वाटा राहिला. पुण्यातल्या ज्या भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा उघडली, त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे, यासाठी हरी नरके यांनी सरकारी पातळीवर खूप प्रयत्न केले. काँग्रेस – राष्ट्रवादी पासून भाजप, शिवसेना-भाजप युती या सर्व सरकारांशी त्यांनी पत्रव्यवहार केला. पाठपुरावा केला. पण त्यांच्या हयातीत हे स्मारक उभे राहू शकले नाही, याची त्यांना कायम खंत राहिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App