विशेष प्रतिनिधी
बीड : Suresh Dhas advice to the Hake : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आपापसात खालच्या पातळीला जाऊन टीका होताना दिसत आहे. दोन्ही समाजातील नेत्यांकडून खालच्या पातळीची विधाने केली जात आहेत. हे नेते एकमेकांवर रोज उठून तोंडसुख घेताना दिसत आहेत. अशातच बीड मधील आष्टी मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी चुकीची भाषा वापरण्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सुनावले आहे.
आष्टी मतदारसंघातील विविध प्रश्नांन संदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यादरम्यान राजकीय विषयावर बोलत असताना सुरेश धस यांनी लक्ष्मण हाके वर टीका केली. लक्ष्मण हाकेने बोलत असताना आपली भाषा भाषा संभाळावे. लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा आणि विरोध करण्याचा अधिकार आहे परंतु बोलताना विचार करून बोलले पाहिजे. हाके हे चुकीच्या पद्धतीची भाषा वापरत आहेत. लक्ष्मण हाके यांचा बोलविता धनी कोण आहे हे मला चांगले ठाऊक आहे असे यावेळी सुरेश धस म्हणाले.
अशा भाषेमुळे मराठा आणि ओबीसी समाजात द्वेष निर्माण होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे . दोन्ही समाजाकडून यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेवराईत जाऊन निवडून आलेल्या उमेदवाराला तुम्ही दांडके दाखवले हे योग्य नाही. असे धस यावेळी बोलताना म्हणाले. बंजारा समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
“आता मराठे ओबीसी आले आहेत म्हणजे पाटील की संपलेली आहे, आता ते देशमुख राहिलेले नाहीत. त्यामुळे मराठ्यांनी आपल्या पोरी आमच्या पोरांना द्याव्यात . ” असे विधान हाके यांनी केले होते.
आता सुरेश धस यांच्या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागेल. आता दोन्ही बाजूचे नेते आपल्या तोंडाला आवर घालून हा वाद थांबवतील की तो अधिकच चिघळवतील ही पहावी लागेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App