विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prithviraj Chavan शिवसेनेच्या वकिलांना चिन्हाच्या खटल्यामध्ये कोर्टात चुकीचे मुद्दे मांडल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. एका मिनिटांमध्ये हा खटला संपला, निवडणुका झाल्या नाहीत हा मुद्दा मांडायला हवा होता, तो मांडला गेला नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तर स्थानिक निवडणुका होण्यापूर्वी तुम्ही आम्हाला चिन्हाबाबत लवकर निर्णय द्या असेही म्हणायला हवे होते असे चव्हाणांनी म्हटले आहे.Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शिवसेनेचा जो खटला झाला त्यामध्ये वकिलांनी चुकीचे अर्ग्यू केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात खटला एका मिनिटात संपला. कोर्टाने काय म्हटले की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो म्हणजे सर्व निवडणूक संपल्यावर ऐकणार. त्यावेळी मुद्दा मांडायला हवा होता की पक्ष रोजच निवडणुका लढत असतात. पण नागरिक दोनच निवडणुका लढत असतो ती म्हणजे देशाची आणि एक राज्याची. 10-10 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, भाजप सरकारने 73 आणि 74 वी घटना दुरुस्ती पार मोडून काढली आहे.Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, त्यामुळे जनतेला आपला नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाहीये पण हा विषय वेगळा आहे.त्यामुळे तुम्ही आम्हाला चिन्हाचा निर्णय लवकर द्या, या निवडणुका होण्यापूर्वी ही बाजू मांडायला हवी होती, ती मांडली गेली नाही. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 10 वर्षे झाल्या नाहीत हे सांगितले का?
काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार
कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत महा विकास आघाडी करणे शक्य झाले नसल्याने कराडमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल. तर, मलकापुरात मात्र, निवडणूक न लढवता समविचारी उमेदवारांना मदत करेल अशी काँग्रेसची भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. चव्हाण म्हणाले की,काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः सभा घेणार आहे. प्रत्येक प्रभागात जाणे शक्य नसले तरी मोठ्या सभांद्वारे प्रचाराला वेग देताना, महा विकास आघाडीतील तसेच समविचारी उमेदवारांनाही आम्ही हातभार लावणार आहोत.
तिथे समविचारी उमेदवारांना पाठिंबा
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मनोहर शिंदे यांनी आपल्या निर्णयाची कल्पना दिली असती तर, त्यांना मी आशीर्वादच दिले असते. मला बाहेरून माहिती मिळाली; त्यांनी व्यक्तिगतरीत्या सांगितले नाही. कराडमध्ये महा विकास आघाडी शक्य न झाल्याने काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरली असून, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव यांनी नगराध्यक्ष आणि विविध प्रभागांत नगरसेवकपदासाठी 15 उमेदवार दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचाही एक उमेदवार असून, त्यांचाही आम्ही प्रचार करणार आहे. मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतही समविचारी उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App